Agriculture news in marathi Seminar at Panjabrao Deshmukh Agricultural University | Agrowon

शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ. विलास भाले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकरीभिमुख संशोधनावर भर देत आहे. या भागातील खारपाण पट्ट्याच्या विकासासाठी विविध पीकपद्धतीवर भर देत असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. 

अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकरीभिमुख संशोधनावर भर देत आहे. या भागातील खारपाण पट्ट्याच्या विकासासाठी विविध पीकपद्धतीवर भर देत असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. 

येथे मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाअंतर्गत वातावरण अनुरूप दिशादर्शक कृषी तंत्रज्ञान याविषयावर कृषी चर्चासत्राचे आयोजन येथे करण्यात आले. या वेळी उद्‌घाटन सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ. भाले बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉ. एस. के. चौधरी यांनी मार्गदर्शनपर भाषणात जमिनीच्या मूलभूत गुणधर्मावर संशोधनाची गरज असल्याचे नमूद केले. एनबीएसएसचे संचालक डॉ. पी. चंद्रन यांनी मार्गदर्शन करताना मृद सर्वेक्षण व तपासणीद्वारे जमीन व्यवस्थापन करण्यावर भर दिला. माजी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी जमीन आरोग्य सुधारणेसाठी भूगर्भाचा अभ्यास होणे काळाची गरज असल्याचे नमूद केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. एस. धवन यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय शेती व्यवस्थापन व चारही कृषी विद्यापीठाचे संशोधन सरळ व सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी कृषी अधिष्ठाता डॉ. पी. जी. इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. आर. कडू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 


इतर ताज्या घडामोडी
‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि...
नक्षलवाद्यांनीही घेतला कोरोनाचा धसका;...मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत...
मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस...मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी...
नांदेड जिल्ह्यात गारपीटीमुळे पिके...नांदेड : जिल्ह्यातील ४० मंडळांमध्ये मंगळवारी (ता....
इचलकरंजीत विक्रेत्यांकडून चाराविक्रीचे...कोल्हापूर : वैरण बाजारात चारा विक्रेत्यांनी...
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी...नांदेड :‘‘‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या...
चाकूर तालुक्यात गारपीटीने पिके,...चापोली, जि. लातूर : चाकूर तालुक्यातील धनगरवाडी व...
बंदीवानांनी पिकवला भाजीपालाअकोला ः येथील जिल्हा कारागृहात असलेल्या शेतीत...
नांदेड जिल्ह्यात सहा हजार क्विंटल...नांदेड : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लॅाकडाऊन...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची पावणे...औरंगाबाद : ‘‘राज्य कापूस पणन महासंघातर्फे...
अकोला पाणी टंचाईच्या उपाययोजना खोळंबल्याअकोला ः एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे ग्रामीण भागात...
अकोला बाजार समितीत गव्हाची टोकन...अकोला ः ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक...
वाडेगावमध्ये शेतकऱ्यांकडून मोफत...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना सहकार्य...
लॉकडाऊनमुळे ओझोनचा थर भरतोय का?सध्या सर्वत्र एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ओझोनचा...
हिंगणघाट तालुक्‍यात सीसीआयकडे थकले...वर्धा ः सीसीआयला कापूस देणाऱ्या हिंगणघाट तालुक्‍...
नेरच्या शेतकऱ्यांची सोन्यासारखी फुले...देऊर, जि. धुळे : जगासह देशात ‘कोरोना’ विषाणूने...
विदर्भात कोरोना बाधितांची संख्या पोचली...नागपूर ः बुलडाणा, अमरावती नंतर नागपुरातील पहिल्या...
पुणे बाजार समितीत ३२५ वाहनांमधून...पुणे : शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या...
इंदापुरातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळपुणे  ः  कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू...
`कोरोना`च्या पार्श्वभूमीवर पुणे...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी...