agriculture news in marathi, Sena wants to make farmers debt-free, says Uddhav | Page 3 ||| Agrowon

कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार : उद्धव ठाकरे

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

मुंबई : मधुमेहासारख्या २०० चाचण्या १ रुपयात करतानाच शेतीखालील क्षेत्रवाढीसाठी अल्पभूधारक व आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट दहा हजार जमा करण्यासोबत कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याची घोषणा शिवसेनेने वचननाम्यात केली आहे. 

मुंबई : मधुमेहासारख्या २०० चाचण्या १ रुपयात करतानाच शेतीखालील क्षेत्रवाढीसाठी अल्पभूधारक व आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट दहा हजार जमा करण्यासोबत कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याची घोषणा शिवसेनेने वचननाम्यात केली आहे. 

विधानसभा निवडणूकपूर्व ‘वचननाम्यात’ शिवसेनेने राज्यातील जनतेवर आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी (ता.१२) ‘मातोश्री’वर वचननामा प्रकाशित झाला. या वेळी आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित होते. कृषी उत्पादने आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर विविध योजनांचा यात समावेश आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी वचननाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण केली जातील, असा दावा केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फक्त आश्वासने देत नाही, तर वचन देते आणि ते पूर्ण करते, असे सांगत आपला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला. काही वचने दसरा मेळाव्यात सांगितली आहेत आणि उरलेली वचने या वचननाम्यात देत असल्याचेही या वेळी त्यांनी सांगितले. तसेच या वेळी निवडणुकीत चुरस नाही. ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून, महाराष्ट्र हा वचननामा स्वीकारून आम्हाला बहुमत देईल, असा विश्वासही व्यक्त केला.शिवसेनेच्या वचननाम्यात प्रत्येक घटकासाठी विशेष योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या वेळच्या घोषणापत्रात आदित्य ठाकरे यांचाही सक्रिय सहभाग असल्याचे दिसून आले. स्वतः आदित्य ठाकरे यांनी हा वचननामा अभ्यास करून तयार केल्याचे म्हटले. 

शेती क्षेत्रासाठी वचनाम्यात काय आहे... 

 •   शेतीखालील क्षेत्रवाढीसाठी अल्पभूधारक व आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट दहा हजार जमा करणार 
 •  कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार
 •  शेत तिथे ठिबक सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी ३ वर्षांसाठी ९५ टक्के अनुदान देणार
 •  गटशेती करून दर्जेदार शेतीमाल व बागायती उत्पादन निर्मितीवर भर देणाऱ्या शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज देणार
 •  बी-बियाणे, खते आणि औजारे खरेदीत सवलत 
 •  विशेष हमीभाव देणारे धोरण आखणार व राबविणार, ज्यामुळे शेतकऱ्यांना किमान दरमहा २० हजार उत्पन्न मिळू शकेल. 
 •  शेतीमधील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आवश्यक घटकांच्या किमती पुढील पाच वर्षे स्थिर ठेवणार
 •  पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करून व खासगी कंपन्यांच्या मनमानीस पायबंद घालून ज्याचे नुकसान त्या शेतकऱ्याला भरपाई मिळण्यासाठी तालुका, सर्कल स्तरावर संबंधित विमा कंपन्यांचे कार्यालये सुरू करणार, 
 •  पुरांमुळे व समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीसाठी आणि मत्स्य टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना भरपाई देणार
   

इतर अॅग्रो विशेष
राज्यात धरणांमध्ये ३८ टक्के साठापुणे : मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून...
जुलैअखेर पावसाने सरासरी गाठलीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची...
सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस...सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य...
मुगावर काय फवारायचे?अकोला ः कडधान्य वर्गीय पिकांपैकी एक प्रमुख...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
दूध दर आंदोलनाचा राज्यभर एल्गारपुणे: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व...
पीकविमा नोंदणीत महाराष्ट्राची आघाडीपुणे: डिजिटल तंत्राचा वापर करून पंतप्रधान पीकविमा...
कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायातून...विंग (ता. खंडाळा,जि.सातारा)  गावातील तेरा...
कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा अंदाज  पुणे ः राजस्थानचा दक्षिण भाग ते उत्तर...
आता हवी भरपाईची हमी चालू खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठीची काल...
कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत...पुणे : बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत (ता.४)...
साखर कारखान्यांची देखभाल दुरुस्ती गतीनेकोल्हापूर: कोविडच्या पार्श्‍वभूमीवर साखर...
बियाणे न स्वीकारणाऱ्यांना ‘महाबीज'कडून...अकोला ः  या हंगामात ‘महाबीज’ने विक्री...
विदर्भात तीन महिन्यांत ५ कोटींच्या...अमरावती : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी...
देशातील धरणांमध्ये जलाशयांमध्ये ४१...नवी दिल्ली: देशातील धरणांमध्ये यंदा समाधानकारक...
‘पीएम-किसान’ योजनेचे अकरा लाख अर्ज पडूनपुणे: पंतप्रधान किसान सन्मान योजनेत (पीएम-किसान)...
मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात १०४ टक्के...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून)...
पीकविम्यासाठी दमछाक पुणेः यंदाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी विमा...
साखरेची बफर स्टॉक योजना बंद केल्यास...कोल्हापूरः साखरेची बफर स्टॉक योजना बंद...
खपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...