Agriculture news in marathi Sending crop damage report in Paganri area | Agrowon

`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल पाठवणार`

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

पांगरी (ता.बार्शी) भागातील पीक नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून पंचनामे करण्याबाबत चर्चा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक रविंद्र माने यांनी दिली.

पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा, बारा दिवसांपासून रोजच पडणाऱ्या पावसाने सोयाबीनसह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याची पाहणी जिल्हा कृषी अधिक्षक रविंद्र माने यांच्या पथकाने केली. या पीक नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून पंचनामे करण्याबाबत चर्चा करण्यात येईल, अशी माहिती माने यांनी दिली.

उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र कांबळे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी सागर बारवकर, भारती एक्सा पीक विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी नागेश बोधीधा, तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, मंडळ कृषी अधिकारी सोमनाथ साठे, कृषी पर्यवेक्षक सुधीर काशीद, कृषी सहाय्यक मदन तांबारे, संदीप झाडे, शेतकरी डॉ. अरूण नारकर, बाबासाहेब जाधव, चंद्रकांत जाधव, रामलिंग सुरवसे आदी उपस्थित होते.

पथकाने पांगरी, चिंचोली, ढेंबरेवाडी, गौडगाव आदी गावच्या सोयाबीन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पांगरीसह आसपासच्या गावांत सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आहे. सोयाबीन शेंगांना मोड फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत ‘सकाळ’ व ‘अॅग्रोवन’मधून वृत्त प्रसिध्द केले होते.

जिल्ह्यात सप्टेंबरअखेर ४८८ मी.मी. पाऊस पडतो. मात्र आतापर्यंत ५३२ मि.मी. पाऊस झाला. शेंगा उगवल्या आहेत. काढणी पश्चात नुकसान, उत्पादनापेक्षा ५० टक्के पेक्षा कमी उत्पादन होत असेल, तर शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत चर्चा करून अहवाल सादर करण्यात येईल, असे माने यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांनी क्रॉप इन्सुरंन्स नावाच्या अॅपव्दारे पीक नुकसानीची माहिती, फोटो विमा कंपनीस तत्काळ देणे गरजेचे आहे. किंवा तालुका कृषी कार्यालयास अर्ज करावा. विमा कंपनीचे प्रतिनिधी पाहणी करून जिल्हा स्तरावर अहवाल देतील.
- रविंद्र माने, जिल्हा कृषी अधिक्षक, सोलापूर. 
 


इतर ताज्या घडामोडी
किसान रेल्वेने सांगलीतून हळद जाणार इतर...सांगली ः किसान रेल्वेतून शेतकऱ्यांसह, उद्योग आणि...
वऱ्हाडात पीएम किसानचे साडे तेरा कोटी...अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या मदतीस...
चिपळूणात साडेसात हजार शेतकऱ्यांना...रत्नागिरी ः परतीच्या पावसाने चिपळूण तालुक्यातील...
रिसोड बाजारात सोयाबीनची विक्रमी आवकवाशीम ः रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापूर जिल्ह्यात मदतीसाठी ३३५ कोटींची...सोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील...
अकोल्यात शेतकरी करणार दोन लाख क्विंटल...अकोला ः गेल्या काही हंगामापासून सोयाबीन...
संत गाडगेबाबा सूतगिरणी सुरू करावी ः...अमरावती : कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील सगळी धरणे तुडूंबपुणे ः चालू वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये...
भंडाऱ्यात ७९ धान खरेदी केंद्रांना मंजुरीभंडारा ः केंद्र सरकारच्या किमान आधारभूत खरेदी...
सोलापूर जिल्ह्यात रास्त भाव दुकानांना...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात ३१ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी...जळगाव ः खानदेशात यंदा गव्हाची पेरणी सुमारे दोन...
परभणी जिल्ह्यात सतरा हजार क्विंटल...परभणी : ‘‘यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी...
शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची प्रतीक्षातऱ्हाडी, जि. धुळे : वरुणराजाच्या लहरीपणामुळे पिके...
नाशिक जिल्ह्यात लिलाव बंदमुळे शेतकरी...नाशिक : मागील वर्षी हवामान बदल, अवकाळी पाऊस व...
‘कृषी स्वावलंबन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज...परभणी : ‘‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ....
सोयाबीन बियाणे विक्रेत्यांविरुध्द ...अकोला ः यंदाच्या खरिपात सोयाबीन बियाणे उगवले...
शोषणाविरोधात एकवटले संत्रा उत्पादक अमरावती : व्यापाऱ्यांचा शोषणाविरोधात एल्गार...
कांदा साठा मर्यादा वाढविण्याची मागणी नाशिक: कांदा साठा मर्यादा घालून दिल्याने...
दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनाची सूत्रेगोठ्याच्या भोवतालच्या परिसरात दलदल आणि जास्त गवत...
पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड ठरते...द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा...