अंजीर-सिताफळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. प्रा. विकास खैरे यांचे निधन

अंजीर संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. प्रा. विकास खैरे यांचे निधन
अंजीर संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. प्रा. विकास खैरे यांचे निधन

पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या जाधववाडी (ता. पुरंदर) अंजीर, सीताफळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. प्रा. विकास खैरे (वय ६५) यांचे शनिवारी (ता. १८) पहाटे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा आणि मुलगी परिवार असून, मुलगा परदेशात असल्याने अंत्यविधी रविवार (ता. १९) होणार असल्याचे त्यांच्या निकटर्तीयांकडून सांगण्यात आले.

प्रा. खैरे हे कोल्हापूर कृषी महाविद्यालातून सेवानिवृत्त झाल्यानतंर जाधववाडी (ता. पुरंदर) येथील अंजीर सीताफळ संशोधन केंद्राचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. या संशोधन केंद्राच्या उभारणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. तसेच पुरंदरसह पुणे जिल्हा आणि राज्यात अंजीर सीताफळ लागवड वाढीसाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले होते. ‘ॲग्रोवन’च्या विविध चर्चासत्रांमधून देखील त्यांनी सहभाग घेतला होता.  डॉ. खैरे यांच्या निधनाने अंजीर आणि सिताफळ संशोधनाची मोठी हानी झाली असून संशोधन केंद्र उभारण्याबरोबरच राज्यात लागवड क्षेत्र वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान होते, असे सांगत महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. राजाराम देशमुख यांनी शोक व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com