देवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या चोरीमुळे खळबळ

देवळा, जि. नाशिक : येथील शेतकरी बाजीराव देवबा निकम यांच्या कांदाचाळीतून १० ते १५ क्विंटल कांद्यावर चोरांनी डल्ला मारला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
Sensation due to theft of summer onion in Deola taluka
Sensation due to theft of summer onion in Deola taluka

देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद होती. तर, दुसऱ्या बाजूला कांदा चोरीचे सत्र वाढल्याने शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. कसमादे पट्ट्यात साध्याबकही शेतकऱ्यांकडे थोडाफार कांदा शिल्लक आहे. या परिस्थितीत देवळा तालुक्यात कांदा चोरीच्या घटना वाढत आहेत. तोच मंगळवारी (ता.२७) रात्री वाखारवाडी येथे कांदा चोरीचा प्रकार घडला. येथील शेतकरी बाजीराव देवबा निकम यांच्या कांदाचाळीतून १० ते १५ क्विंटल कांद्यावर चोरांनी डल्ला मारला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

बाजीराव निकम यांनी मोठ्या मेहनतीने उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले. भविष्यात कांद्याचे बाजारभाव वाढतील. आपल्याला भाववाढीचा फायदा होऊन दोन पैसे मिळतील, या अपेक्षेने निकम यांनी देवळा-मालेगाव रस्त्यालगत शेतातील(गट नं.६३१) चाळीत कांदा साठवून ठेवला होता. मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चाळीचे कुलूप व जाळी तोडून १० ते १५ क्विंटल कांदा लंपास केला.

बुधवारी (ता.२८) सकाळी निकम यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी देवळा पोलिस ठाण्यात कांदा चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळे चालू भावाप्रमाणे त्यांना पाऊण लाखाचा फटका बसला आहे.  तालुक्यात कांदा चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकरी भीतीच्या सावटाखाली आहेत.

शासनाने साठवणुकीवर निर्बंध लागू केल्याने बाजारसमित्या बंद होत्या. यावर तोडगा काढून लवकर कांदा खरेदी सुरु करावी. संबंधित चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी  केली.

खरीप कांदा अतिवृष्टीने गेला. तर, उन्हाळी कांद्याची अशी अवस्था होत असल्याने शेतकरी नाहक भरडला जात आहे. दिवसभर काम करून आता रात्रभर कांदाचाळी राखाव्या का? कांदाप्रश्न लवकर मिटणे आवश्यक आहे. - दादाजी भामरे, शेतकरी, खुंटेवाडी, ता. देवळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com