agriculture news in Marathi separate room for agri produce marketing and branding Maharashtra | Agrowon

शेतीमालच्या विपणन, ब्रॅंडिंगसाठी स्वतंत्र कक्ष

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 मार्च 2021

केंद्र सरकारच्या अन्न व उद्योग मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांच्या उत्पादनांचे ब्रॅण्डिंग आणि विपणन प्रभावी होण्यासाठी कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली थिंक टॅंकसह स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 

पुणे ः केंद्र सरकारच्या अन्न व उद्योग मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांच्या उत्पादनांचे ब्रॅण्डिंग आणि विपणन प्रभावी होण्यासाठी कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली थिंक टॅंकसह स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 

या कक्षाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक संघ, कंपनी, संस्था, स्वयंसाह्यता गट, सहकारी उत्पादक संस्थाद्वारा प्रकल्प उभारणीसाठी अन्न व प्रक्रिया उद्योगाशी संबंधित विभागाचा समन्वय साधणे, बॅंक कर्जाशी निगडित प्रकल्प तयार करणे, विपणन व ब्रॅण्डिंग तांत्रिक संस्थांचे बळकटीकरण, सामाईक पायाभूत सुविधा, क्षमता विकास बांधणी आदी बाबींवर काम करण्यात येणार आहे. एक जिल्हा एक उत्पादनांतर्गत, प्रक्रिया उद्योग उभारणी केली जाणार असून, यासाठी संबंधित संस्थेची उलाढाल पाच कोटींची असणे गरजेचे आहे. तर याद्वारे उत्पादित होणाऱ्या शेतमालाच्या ब्रॅण्डिंग व मार्केटिंगसाठी पाच लाखांचे अर्थसाह्य मिळणार आहे. 

प्रतिक्रिया
अन्न व प्रक्रिया उद्योगांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठीची सुसूत्रता, समन्वयाबरोबरच, उत्पादित झालेल्या शेतीमालाच्या मार्केटिंग, ब्रॅण्डिंगसाठी मार्गदर्शन करणे हा प्रमुख उद्देश आमच्या समितीचा आहे. त्यानुसार काम केले जाईल.
- सुनील पवार, कार्यकारी संचालक, पणन मंडळ, तथा समिती सदस्य 

अशी आहे समिती 
अध्यक्ष ः
धीरजकुमार - (कृषी आयुक्त) 
सदस्य ः सुनील पवार (कार्यकारी संचालक, पणन मंडळ), सदाशिव सुरवसे (सहसंचालक, उद्योग), मिलिंद आकरे (व्यवस्थापकीय संचालक, सहकार विकास महामंडळ), शिरीष जमदाडे (कृषी सहसंचालक), बाबासाहेब पारधे (कृषी औद्योगिक महामंडळ), प्रदिप पराते (उप सरव्यवस्थापक नाबार्ड), संजय पाटील (अन्नधान्य महामंडळ), आर. रवींद्र (अपेडा, उप सरव्यवस्थापक), दादाभाऊ गुंजाळ (उपसंचालक), विलास शिंदे (सह्याद्री फार्मस), गिरीष चितळे (चितळे दूध), डॉ. डी. एन. कुलकर्णी (उपाध्यक्ष, जैन इरिगेशन अन्न व प्रक्रिया तज्ज्ञ), विनय ओसवाल (नाफारी), नीलेश नलावडे (कृषी विज्ञान केंद्र बारामती), सिद्धराम मशाळे, सुभाष नागरे (सदस्य सचिव आणि संचालक कृषी प्रक्रिया व नियोजन)


इतर अॅग्रो विशेष
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...