हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्ष

हिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने वेळीच उपाययोजना केल्या आहेत. अत्यावश्यक सेवा व वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात २४x७ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून त्याचा संपर्क क्रमांक ९०२१४८४१०५ असा आहे.
Separate room for vehicle license in Hingoli

जिल्ह्यातील सर्व माल वाहतूकदारांनी अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणार असल्याबाबत पुरावा सादर करुन प्रत्येक वाहनासाठी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. संचारबंदीमुळे अर्ज कार्यालयाच्या mh३८@mahatranscom.in या ई-मेल वर वाहन क्रमांक नमtद करुन वाहनाचे कागदपत्र सादर करुन अर्ज केल्यास ई-मेलद्वारे प्रमाणपत्र जारी केले जाणार आहे. सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com