सप्टेंबरमधील पावसामुळे प्रकल्पांना दिलासा

सप्टेंबरमधील पावसामुळे प्रकल्पांना दिलासा
सप्टेंबरमधील पावसामुळे प्रकल्पांना दिलासा

अकोला  : गेल्यावर्षात अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागले होते. प्रकल्पही भरू शकले नव्हते. यंदा सप्टेंबरमध्ये होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पांना मोठा दिलासा मिळाला आहे. वऱ्हाडातील अकोला, वाशीम, बुलडाणा या तीनही जिल्ह्यांतील प्रकल्पांना कमीअधिक प्रमाणात फायदा होत असून प्रकल्पसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची बरीच गर पूर्ण होईल अशी स्थिती आहे.  पावसाळ्याला सुरवात होऊन आता साडेतीन महिन्यांचा काळ लोटला. ऑगस्ट अखेर या भागातील काही प्रकल्प सोडले तर बहुतांश प्रकल्पांची स्थिती समाधानकारक नव्हती. आता मात्र सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने प्रकल्पांना दिलासा मिळाला. या विभागातील वान हा मोठा प्रकल्प १०० टक्के भरला. काटेपूर्णामध्ये २०.८५ दलघमी साठा झाला. नळगंगा प्रकल्पात २६.३८ दलघमी म्हणजे ३४.४९ टक्के पाणी आले. पेनटाकळी प्रकल्पात ५८.२३ दलघमी (९७.१० टक्के) तर खडकपूर्णा पहिल्यांदाच मृतसाठ्यातून बाहेर आले. या प्रकल्पात ५.६ दलघमी पाणी साठले असून सध्या ५.४२ एवढी टक्केवारी झाली आहे.   मध्यम प्रकल्पांचा आढावा घेतला असता अकोला जिल्ह्यातील मोर्णा १६.९३ दलघमी (४०.८३ टक्के), उमा २.९५ दलघमी (२५.२६ टक्के), घुंगशी बॅरेज ५.८२ दलघमी (३३.७० टक्के), वाशीम जिल्ह्यातील अडाण ९.२७ दलघमी (१३.७८ टक्के), सोनल ७ दलघमी (४१.३७ टक्के), एकबुर्जी ६.४२ दलघमी (५३.४३ टक्के), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा ३३.९३ दलघमी(१०० टके), पलढग ७.५१ दलघमी(१०० टक्के), मस १५.०४ दलघमी (१०० टक्के), मन २२.९० दलघमी (६२.१८ टक्के), तोरणा ७.६६ दलघमी(९७.८ टक्के), उतावळी प्रकल्प १३.३ दलघमी (६५.८४ टक्के) असा साठा झालेला आहे. आगामी काळात मॉन्सून परतीमुळे पावसाची आणखी शक्यता असल्याने प्रकल्पांची स्थिती सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या वेळी सलग पावसामुळे जलसंधारणाची कामे तुडूंब भरलेली आहेत. त्याचाही आगामी रब्बी हंगामात मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. सध्या विहिरींची पातळीसुद्धा वधारत आहे. सखल भागातील विहिरींमध्ये तुडुंब पाणी झालेले असल्याने त्याचा अतिरिक्त उपसासुद्धा काही शेतकरी करीत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com