रेशीम शेतीवर आधारित पूरक उद्योगातून रोजगारनिर्मिती शक्य : डॉ. वासकर

रेशीम शेतीवर आधारित पूरक उद्योगातून रोजगारनिर्मिती शक्य : डॉ. वासकर
रेशीम शेतीवर आधारित पूरक उद्योगातून रोजगारनिर्मिती शक्य : डॉ. वासकर

परभणी : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीमुळे शाश्‍वत उत्पन्न मिळत आहे. रेशीम शेतीवर आधारित धागानिर्मिती, वस्त्रनिर्मिती उद्योग सुरू झाले, तर रोजगारनिर्मिती होईल. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठातर्फे नेहमी तांत्रिक मार्गदर्शन केले जात आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले. राष्ट्रीय कृषी विभाग योजना आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेअंतर्गत शनिवारी (ता. १) मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील निवडक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोषनिर्मिती आणि काढणी तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमात शनिवारी (ता. १) डॉ. वासकर बोलत होते. या वेळी संशोधन उपसंचालक डॉ. अशोक जाधव, कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, पाणी व्यवस्थापन योजनेचे डॉ. अशोक कडाळे, पूर्णा येथील रेशीम कोष मार्केटचे अध्यक्ष डॉ. संजय लोलगे, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे, केंद्रीय रेशीम मंडळांतर्गत संशोधन विस्तार केंद्राचे शास्त्रज्ञ ए. जे. करंडे, ग्रामीण मोसम सेवा प्रकल्पाचे डॉ. के. के. डाखोरे, संकरित गो पैदास केंद्राचे डॉ. दिनेशसिंह चौहान आदींची उपस्थिती होती. या वेळी डॉ. लटपटे यांनी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना तुती लागवड तंत्रज्ञान, अन्नद्रव्य, पाणी व्यवस्थापन यासोबत रेशीम कीटक संगोपन, रेशीम उद्योगातील यांत्रिकीकरण, रेशीम कोष काढणी व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. डॉ. संजय लोलगे म्हणाले, की पूर्णा येथे रेशीम कोष खरेदी मार्केट सुरू झाल्यामुळे परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना जवळच्या मार्केटची सुविधा उपलब्ध झाली आहे. रेशीम कोषास इतर मार्केटच्या खालोखाल दर दिले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com