agriculture news in marathi, sericulture scheme status, yavatmal, maharashtra | Agrowon

यवतमाळमधील शेतकऱ्यांची रेशीम शेतीला पसंती
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 डिसेंबर 2017
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीला पूरक उद्योग म्हणून रेशीम शेती चांगला पर्याय ठरू शकतो. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणखी एक हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, यवतमाळ.
यवतमाळ  : कपाशी पिकावर आलेल्या संकटांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बोंड अळीने तर आता शेतकऱ्यांसमोर नवे आव्हानच उभे झाले. येत्या हंगामात काय, असा प्रश्‍न आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. मात्र या प्रश्‍नावर शेतकऱ्यांनीच उत्तर शोधले असून, त्यांनी रेशीम शेतीला पसंती दिली आहे. या हंगामात  तब्बल एक हजार शेतकऱ्यांनी त्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे.
 
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी परंपरागत पद्धतीने शेती करतात. मात्र त्यातून मिळणारे उत्पन्न तोकडे आहे. अशातच आता शेती मोठ्या संकटातून जात आहे. पिकांवर होणारा विविध रोग - किडींचा प्रादुर्भाव यानंतर हातात आलेल्या पिकाला मिळणारा कमी भाव ही स्थिती कायम आहे. त्यातच बीटी कापसावर बोंड अळीच्या आक्रमणामुळे तर शेतकऱ्यांसमोर मोठे संकटच उभे ठाकले आहे. काही शेतकऱ्यांनी तर आता या चक्रातून बाहेर पडून नवीन प्रयोग सुरू केले आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे.
 
गतवर्षी जिल्ह्यात २०० एकरांवर तुतीची लागवड करण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात २१३ एकरांवर लागवड झाली. त्यातून ६३ हजार ३५० अंडीपुंजांची निर्मिती करून २७ मेट्रिक टनांचे उत्पादन झाले. पुढील वर्षासाठी २५० एकरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले होते. मात्र ते आता ५०० एकरांवर गेले. रेशीम शेतीसाठी पहिल्यांदाच एक हजार सात शेतकऱ्यांनी अर्ज सादर केलेत.
 
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यात लक्ष देऊन रेशीम संचालनालयाला उद्दिष्ट वाढवून दिले. शिवाय शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे हे उद्दिष्ट वाढविण्यात यश मिळाले. येत्या काळात आणखी किमान एक हजार अर्ज येतील, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
 
‘मनरेगा’मधून मजुरी मिळत असल्याने याला आणखी गती मिळण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील वातावरण रेशीमसाठी पोषण असल्याने कापसाला रेशीम पर्याय ठरू शकतो, अशी शक्‍यता रेशीम संचालयाने वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी आता कपाशीची पर्याय म्हणून रेशीमला पसंती देत असल्याचे चित्र सध्या तरी आकडेवारीवरून दिसून येत आहे.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
औरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरणमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६...
मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...
अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला  ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...
ग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...
हिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...
नरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर  : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...
रेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...
परभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...
पुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...
शरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...
मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...