agriculture news in Marathi, serious challenge of attack of american fall armyworm on maize, pune, maharashtra | Agrowon

मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान गंभीर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जुलै 2019

राज्यात मक्यावर लष्करी अळी दिसून येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. लष्करी अळीमुळे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाकडून योग्य ती पावले उचलली जात आहेत. शेतकऱ्यांसाठी गावातच शास्त्रज्ञांच्या भेटी, शेतीशाळांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यास मदत होईल.
- डॉ. अनिल बोंडे, कृषिमंत्री
 

पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर यंदा मका उत्पादकांच्या चांगल्या उत्पादनाच्या आशेवर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) पाणी फरवले. शेतकऱ्यांनी केलेल्या उपाययोजनांनंतरही लष्करी अळीचे आक्रमण आटोक्याबाहेर आहे. त्यामुळे यंदा मका उत्पादनाविषयी शाश्‍वती नसून मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्रात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील जवळपास दीड लाख हेक्टरवरील मका पीक लष्करी अळीच्या विळख्यात सापडले आहे. 

सातारा जिल्ह्यातील पूर्व भागात सुमारे ११२२ हेक्टर क्षेत्रावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यंदा २८०० हेक्टर क्षेत्रावर मक्याचे पीक आहे. सध्या उगवण झालेल्या मका पिकावर सुमारे दहा टक्क्यांपर्यंत म्हणजेच २८० हेक्टरवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. मराठवाड्यात यंदा दोन लाख हेक्टरवर मका पीक आहे. यापैकी जवळपास ४१ हजार हेक्टरवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे.

खानदेशात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत असून सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. नाशिक जिल्ह्यात १ लाख ४१ हजार ८७६ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. जिल्ह्यात सध्या ४२ हजार ३०० हेक्टरवर प्रादुर्भाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

नगर जिल्ह्यात बारा हजार हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास ९० टक्के क्षेत्रावरील मका पूर्णपणे फस्त करण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यात जवळपास १७ हजार हेक्टर क्षेत्रावरील मका लष्करी अळीने फस्त करण्यास सुरवात केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात मोताळा तसेच देऊळगावराजा तालुक्यात १०० हेक्टरवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर लष्करी अळीचा ४०-५० टक्के प्रादुर्भाव दिसून आला आहे. तर सांगली जिल्ह्यातही मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यात १०२८ हेक्टर क्षेत्रावरील मका बाधित झाला आहे. 

जैविक कीडनाशके उपलब्ध व्हावीत
कृषी कीटकशास्त्र तज्ज्ञ डॉ. अंकुश चोरमुले म्हणाले, की महाराष्ट्रात जवळपास सगळ्या प्रमुख मका उत्पादक जिल्ह्यांत पिकावर अमेरिकी लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. महाराष्ट्रात लष्करी अळीचे व्यवस्थापन कसे करायचे, याबद्दल सरकारी आणि वैयक्तिक शेतकऱ्यांच्या पातळीवर खूपच कमी जागरूकता आहे. आपल्याकडे केवळ रासायनिक कीटकनाशकांवर भर दिला जात आहे.

अमेरिका आणि आफ्रिकी देशांमध्ये एकात्मिक कीडव्यवस्थापन राबविल्यामुळे तिथे अळी अटोक्यात राहिली. आपल्याकडे मक्यात आंतरपिके घेतली जात नाहीत, तसेच कामगंध सापळ्यांच्या वापराबद्दलही फारशी जागरूकता नाही. तसेच अनेक ठिकाणी शेतकरी कीटकनाशकांचा गरज नसताना सुरवातीपासूनच आणि बेसुमार वापर करीत आहेत. त्यामुळे अळीमध्ये कीटकनाशकांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढली आहे. सध्या पावसाळी वातावरण, आर्द्रतेत झालेली वाढ, यामुळे लष्करी अळीच्या प्रसाराला पोषक वातावरण आहे. अशा वेळी जैविक कीडनाशकांचा वापर परिणामकारक ठरू शकतो. परंतु, ही कीडनाशके शेतकऱ्यांना सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. त्या आघाडीवर कृषी विद्यापीठे आणि कृषी खात्याला युद्धपातळीवर काम करण्याची गरज आहे.

प्रादुर्भावाची पातळी (हेक्टरमध्ये)

  • नाशिकः ४२,३००
  • मराठवाडाः ४१,०००
  • खानदेशः १८,०००
  • सोलापूरः १७,०००
  • नगरः १२,०००
  • सातारा ः ११२२
  • सांगलीः १०२८
  • कोल्हापूरः २८०
  • बुलडाणाः १००

प्रतिक्रिया
राज्यातील नाशिक, नंदुरबार, धुळे, सोलापूर, नगर, पुणे, सांगली, बीड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यांत मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या जिल्ह्यात क्रॉपसॅपअंतर्गत कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून किडीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. उपाययोजनांसाठी फेरोमेन सापळे, पीक संरक्षणासाठी एमएसद्वारे सल्ला, पोस्टर, घडीपत्रिका, प्रात्यक्षिके, शेतीशाळांद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
- सुहास दिवसे, कृषी आयुक्त.
 

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...