agriculture news in Marathi, serious drought declare in 112 tahsils, Maharashtra | Agrowon

राज्यात ११२ तालुक्यांत गंभीर दुष्काळ जाहिर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

मुंबई : पावसाने ओढ दिलेल्या आणि दुष्काळाची दुसरी कळ लागू असलेल्या १८० तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीची खात्री केल्यानंतर त्यापैकी १५१ तालुक्यांत राज्य शासनाने बुधवारी (ता.३१) दुष्काळ जाहीर केला. यात ११२ तालुक्यांत गंभीर, तर ३९ तालुक्यांत मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. (बुधवार) ता. ३१ ऑक्टोबरपासूनच या ठिकाणी दुष्काळाची अंमलबजावणी होणार आहे. पुढील सहा महिने ही स्थिती लागू राहणार आहे.

मुंबई : पावसाने ओढ दिलेल्या आणि दुष्काळाची दुसरी कळ लागू असलेल्या १८० तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीची खात्री केल्यानंतर त्यापैकी १५१ तालुक्यांत राज्य शासनाने बुधवारी (ता.३१) दुष्काळ जाहीर केला. यात ११२ तालुक्यांत गंभीर, तर ३९ तालुक्यांत मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. (बुधवार) ता. ३१ ऑक्टोबरपासूनच या ठिकाणी दुष्काळाची अंमलबजावणी होणार आहे. पुढील सहा महिने ही स्थिती लागू राहणार आहे.

दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांत आवश्यक उपाययोजना राबवण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर राहणार असून, त्यांनी तातडीने दुष्काळी उपाययोजना अमलात आणाव्यात, असे निर्देश शासनाने दिले आहेत. दुष्काळ जाहीर करताना वनस्पतीशी निगडित निर्देशांक, लागवडीखालील क्षेत्र, मृद आर्द्रता निर्देशांक आणि जलविषयक निर्देशांक या प्रमुख चार बाबी विचारात घ्याव्यात, असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत. या चार प्रभावदर्शक निर्देशाकांपैकी वाईट स्थिती दर्शवणारे ३ निर्देशांक विचारात घेतले जात आहेत. या चारपैकी राज्यात पावसाचा खंड हा निर्देशांक सर्वात वाईट स्थिती दर्शवणारा आहे. 

खरिपासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर करणे आवश्यक होते. त्यानुसार राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाकडून बुधवारी या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. मध्यम किंवा गंभीर स्वरूपाच्या दुष्काळातच केंद्र सरकारकडून एनडीआरएफमधून मदत मिळणार आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता पुढील महिन्यात राज्य शासनाकडून केंद्र सरकारला या तालुक्यांसाठी दुष्काळी मदतीचे निवेदन पाठवले जाणार आहे. त्यामध्ये शेतीपिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याचे टँकर, तात्पुरत्या पिण्याच्या पाण्याच्या योजना, जनावरांना चारा आदी बाबींच्या मदतीचा समावेश असणार असल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, शासनाने गेल्याच आठवड्यात राज्यातील १८० तालुक्यांत दिलासादायी आठ उपाययोजना लागू केल्या आहेत.

जिल्हानिहाय गंभीर दुष्काळी तालुके
नगर ः कर्जत, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड.
अमरावती ः मोर्शी
औरंगाबाद ः औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर, कन्नड
बीड ः आष्टी, बीड, धारूर, गेवराई, माजलगाव, शिरूर (कासार), वडवणी, आंबेजोगाई, केज, परळी, पाटोदा
उस्मानाबाद ः लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम
चंद्रपूर ः चिमूर
बुलडाणा ः खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा
धुळे ः धुळे, सिंदखेडे
हिंगोली ः हिंगोली, सेनगाव
जळगाव ः अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर (एदलाबाद), पाचोरा, पारोळा, रावेर, यावल
जालना ः अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसांवगी, जाफराबाद, जालना, परतूर
नागपूर ः काटोल, कळमेश्वर
नांदेड ः मुखेड, देगलूर
नंदुरबार ः नंदुरबार, नवापूर, शहादा
नाशिक ः बागलान, मालेगाव, नांदगाव, सिन्नर
पालघर ः पालघर, तलासरी, विक्रमगड
परभणी ः मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू
सांगली ः जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी, तासगाव
साताराः माण, दहीवडी
सोलापूर ः करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर
यवतमाळ ः बाभूळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, राळेगाव, उमरखेड

जिल्हानिहाय मध्यम दुष्काळी तालुके 
पुणे ः आंबेगाव, पुरंदर, सासवड, शिरूर-घोड नदी, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर
सातारा ः कोरेगाव, फलटण
धुळे ः शिरपूर
नंदुरबार ः तळोदे
उमरी, जि.नांदेड
हिंगोली ः कळमनुरी
अमरावती ः अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगाव सुर्जी
यवतमाळ ः केळापूर, मारेगाव, यवतमाळ
चंद्रपूर ः ब्रह्मपुरी, नागभिर, राजुरा, सिंदेवाही 
नागपूर ः नरखेड
वर्धा ः आष्टी, कारंजा
नाशिक ः देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड
अकोला ः बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, तेल्हारा, अकोला
अमरावती ः अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगाव सूर्जी
बुलडाणा ः मोताळा
लातूर ः शिरूर अनंतपाळ
वाशिम ः रिसो

इतर अॅग्रो विशेष
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...
विषबाधेबाबत गांभीर्य कधी?घटना क्रमांक १ ः तारीख - ४ मे २०१९, ठिकाण -...
समवर्ती लेखापरीक्षणातूनच टळतील...इ.स. पूर्व सहाव्या शतकापूर्वी प्राचीन इजिप्शियन...
सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू...जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार देशमुखांकडून...नांदेड जिल्ह्यातील पारडी (ता. अर्धापूर) येथील...
आदिवासीबहुल भागात ‘निसर्गराज’ची घौडदौड धुळे जिल्ह्यातील हारपाडा (ता. साक्री) या...
बचत गटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वरमुंबई  : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ...
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२...नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात...
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे...मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
अतिवृष्टी, पुराचा चार लाख हेक्टरवरील...पुणे  : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे...
अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यातसिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता...
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या...पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने...
‘ती’च्या शिक्षणाची कथाशा ळा-महाविद्यालयांचे निकाल असो  विविध...