agriculture news in marathi Serious offenses will be filed in the case of bogus seeds : CM Uddhav Thackarey | Agrowon

बोगस बियाणेप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल होतील : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जून 2020

बोगस बियाण्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. सरकारकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जे फसवतील त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होतील : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : ग्रामीण भागातून बोगस बियाण्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. सरकारकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जे फसवतील त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होतील व त्यांच्याकडून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई वसूल केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

लॉकडाउन ५ ची मुदत ३० जूनला संपत आहे, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. २८) राज्यातील जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी १ जुलै रोजी येणाऱ्या राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्ताने त्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच हा दिवस माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म दिवस असून हा सप्ताह शेतकरी सप्ताह म्हणून साजरा केला जात असल्याचे सांगितले. कोरोनाच्या संकटकाळात दिवसरात्र शेतात राबून अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनाही मी विनम्र नमस्कार करतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘‘ग्रामीण भागातून बोगस बियाण्याच्या तक्रारी काही प्रमाणात प्राप्त होत आहेत, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जे फसवतील त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होतील व त्यांच्याकडून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई वसूल केली जाईल. कर्जमुक्तीच्या योजनेची अंमलबजावणी करताना काही ठिकाणी निवडणुकीची आचारसंहिता आल्याने आणि नंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देता आला नाही, ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहे.’’

आपल्यातील एकसंधपणा कायम ठेवताना आत्तापर्यंत शासनाला ज्याप्रकारे सहकार्य दिले, तसेच सहकार्य यापुढेही कायम ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी सर्वधर्मीयांना धन्यवाद देताना म्हटले, की सर्वांनी सामाजिक भान ठेवून शिस्तबद्धरीतीने सगळे सण साधेपणाने आणि घरातल्या घरात साजरे केले. सर्वांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले. वारीचा सोहळा या वेळी नाइलाज म्हणून संयम दाखवत साजरा केला जात असताना वारकऱ्यांचा, राज्यातील विठ्ठलभक्तांचा प्रतिनिधी म्हणून आपण आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाला जाणार असल्याचेही व त्याच्या चरणी कोरोनामुक्त राज्याचे साकडे घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

केवळ आर्थिक चक्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्रात मिशन बिगीन अगेन सुरू केले असले तरी कोरोनाचे संकट टळलेले नाही, धोका टळलेला नाही, गर्दी करू नका, आवश्यक कामासाठीच बाहेर जा, असे आवाहन करताना महाराष्ट्र हा औषधोपचार आणि सुविधा देण्यात कुठेही मागे नसून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी आपला प्लाझ्मा दान केल्यास अनेकांचे प्राण वाचतील, असेही आवाहन त्यांनी केले.

केसेस पुन्हा वाढताना दिसल्या तर नाइलाज म्हणून काही भागांत पुन्हा लॉकडाउन करावे लागेल. आता असे होऊ द्यायचे का, याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, असेही मुख्यमंत्री जनतेला संबोधित करताना म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले...

  • शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे
  • बोगस बियाण्याच्या तक्रारींची गंभीर दखल
  • शेतकऱ्यांना जे फसवतील त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होतील
  • कर्जमुक्तीची अंमलबजावणी पुन्हा सुरू
  • सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार
  • वारकऱ्यांचा, विठ्ठलभक्तांचा प्रतिनिधी म्हणून आषाढीला पंढरपूरला जाणार 

इतर अॅग्रो विशेष
विक्री साखळी सक्षमीकरणाची सुवर्णसंधी शेतमालाचे उत्पादन घेणे हे काम फारच खर्चिक आणि...
कृषी व्यवसायासाठी 'स्मार्ट' संजीवनी  या पुढे वैयक्तिक शेती उत्पादने ही कालबाह्य...
गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख ...मुंबई: कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या...
सोयाबीन बियाणे नापासचे प्रमाण ६५ टक्केपरभणी: परभणी येथील कृषी विभागाच्या बीज...
‘पणन’च्या सुविधा केंद्रातून ६४८ टन...नाशिक: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या भेंडी...
कृषी खाते म्हणते, पुरेशी खते उपलब्धपुणे: राज्यात खताची टंचाई नाही. मात्र, यंदा...
देशातून आत्तापर्यंत साखरेची ४८ लाख टन...कोल्हापूर: देशातून आत्तापर्यंत ४८ लाख ६९ हजार टन...
खत ‘आणीबाणी’ने शेतकरी त्रस्तपुणेः खरिपाची पेरणी झाल्यानंतर पिके बहारात असून...
खरेदी बंद; शेतकऱ्यांचा मका घरातच औरंगाबाद : आधारभूत किमतीने सुरु असलेली मका खरेदी...
धीरज कुमार यांनी कृषी आयुक्तपदाची...पुणे: राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार यांची...
देशात खरिपाची पेरणी ५८० लाख हेक्टरवरपुणेः देशात आत्तापर्यंत खरिपाची ५८० लाख हेक्टरवर...
खरीप पिकांतील तण नियंत्रण व्यवस्थापनजगात सर्वांत जास्त वापर तणनाशकांचा (४३.६ टक्के)...
राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार;...पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार यांची...
एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणीअकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे...
दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात...जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक...
दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान...इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत...
अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत...अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या...
अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी २७ कोटीपुणे: राज्यातील अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी...
ग्लायफोसेट वापराच्या मसुद्याविरुद्ध दाद...पुणे: केंद्र सरकारने ग्लायफोसेट तणनाशकाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्यांवर राज्यात ४६...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची...