agriculture news in marathi, The serious question of water, fodder in Nashik district | Page 2 ||| Agrowon

नाशिक जिल्ह्यात पाण्यासह चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जुलै 2019

नाशिक  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचे आगमन झाले आहे. तरीही अनेक तालुक्यांत समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. यासाठी जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

नाशिक  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचे आगमन झाले आहे. तरीही अनेक तालुक्यांत समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. यासाठी जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

मालेगाव तालुक्यात पाणी आणि चाराटंचाईच्या झळा या तालुक्यामध्ये तीव्र झाल्या आहेत. तालुक्यात डोंगराळे येथे छावणीचे कामकाज नियोजनबद्ध सुरू होते. चारा, पाणी सुविधा पुरविली जात होती. या वेळी या भागात दुष्काळात अनंत अडचणी असताना प्रशासनाने छावणीची परवानगी दिली नव्हती, मात्र ऐन पावसाळ्यात या छावणीला मंजुरी दिल्याने ''वरातीमागून घोडे'' ही प्रशासनाची भूमिका समोर आली आहे. 

यावर जिल्हा प्रशासनाकडून एकूण १० चारा छावण्या सुरू होत्या. त्यापैकी मालेगाव तालुक्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना मांजरे, झोडगे आणि चिखलओहोळ येथे छावण्या सुरू करण्यात आल्या. या छावण्याही जून महिन्यात मंजूर झाल्या होत्या. मालेगावचे प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्या कार्यवाहीमुळे परवानग्या मिळाल्याचे छावणीच्या संचालकांनी सांगितले. या ठिकाणी अजूनही ३ हजार ८८ जनावरे वास्तव्यास आहेत.

तालुक्यात चौथी चारा छावणी डोंगराळे येथे वर्धमान परिवाराच्या वतीने सुरू होती. अखेर ऐन पावसाळ्यात ही छावणी चालविण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील अखिल भारतीय कृषी गो सेवा संघ गोपुरी यांना मंजुरी देण्यात आली. ही परवानगी उन्हाळ्यात का दिली नाही, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. 

जनावरे सांभाळावी कशी?
खेडोपाड्यांत चारापाण्याची व्यवस्था झाल्याने व जनावरांची संख्या कमी झाल्याने छावण्या बंद केल्याचे सांगण्यात येते. मात्र अजूनही जिल्ह्यात चारा-पाण्याअभावी जनावरांचे हाल होत आहेत.

प्रशासनाने सुरू असलेल्या १० छावण्यांपैकी ६ छावण्या बंद केल्या आहेत. पाऊस पडल्याने अनेक शेतकरी आपली जनावरे घराकडे घेऊन गेले. मात्र, तरीही जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न अजूनही सुटला नसल्याची स्थिती आहे. त्यामुळेही जनावरे सांभाळावी कशी, असा प्रश्न पशुपालकांसमोर आहे.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...
साताऱ्यातील धरणांमध्ये ९८ टक्‍क्‍यांवर...सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
नियोजनशून्य कारभारामुळे ६० टक्केच निधी...मुंबई ः भाजप-शिवसेना युती सरकारची पाच वर्षांतील...
अकोल्यात उडीद प्रतिक्विंटल सरासरी ४६००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक...