सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत ‘भाजपा जनविकास’चा एकतर्फी विजय

मालेगाव (जि. वाशीम)येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपा जनविकास आघाडीचा एकतर्फी विजय झाला आहे.
In the service co-operative society election Unilateral victory of BJP Janvikas
In the service co-operative society election Unilateral victory of BJP Janvikas

मालेगाव, जि. वाशीमः येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपा जनविकास आघाडीचा एकतर्फी विजय झाला आहे. जनविकास आघाडीचे १३ उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पॅनेलच्या उमेदवारांचा निवडणुकीत पराभव झाला. आमदार अमित झनक काँग्रेस जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर पार पडलेल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांच्या समर्थकांचा व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा हा सहकार क्षेत्रातील पराभव झाला आहे.  मालेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीकडे आगामी नगर पंचायतीची रंगीत तालीम म्हणून पहिले जात होते. मागील २५ वर्षांपासून सोसायटीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक बिनविरोध निवडून येत होते. या वेळी आमदार झनक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करण्यात आली. आमदार झनक यांचे समर्थक व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जगदीश बळी यांचे चिरंजीव राजेश बळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव चोपडे, रामचंद्र बळी, रंजना खवले आदी आमदार झनक समर्थकांनी ही निवडणूक लढविली. याविरुद्ध जनविकास आघाडी व भाजपाने निवडणूक एक दिलाने लढविली. या आघाडीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांचे जनविकासआघाडीचे सात तर भाजपाच्या सहा उमेदवारांचा समावेश होता. माजी खासदार देशमुख यांचे समर्थक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन देवळे, सय्यद आयुब, रामदास काटेकर, भाजपाचे डॉ. विवेक माने, किशोर महाकाळ आदींनी नियोजनबद्ध प्रचार करून यश मिळवले. त्यांचे सर्व तेराही उमेदवार संचालक झाले आहेत. या निवडणुकीनंतर शहरात व तालुक्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव नियोजनाच्या अभावामुळे झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com