खानदेशात तिळाचे क्षेत्र अल्पच

जळगाव : खानदेशात तीळ पिकाखालील क्षेत्र गेले अनेक वर्षे ५०० हेक्टरवर पोचले नसल्याची स्थिती आहे. यंदाही क्षेत्र कमीच आहे. पाऊसमान चांगले नसल्याने पिकाची उत्पादकता, उत्पादन याबाबतही प्रश्न आहेत.
Sesame area in Khandesh is small
Sesame area in Khandesh is small

जळगाव : खानदेशात तीळ पिकाखालील क्षेत्र गेले अनेक वर्षे ५०० हेक्टरवर पोचले नसल्याची स्थिती आहे. यंदाही  क्षेत्र कमीच आहे. पाऊसमान चांगले नसल्याने पिकाची उत्पादकता, उत्पादन याबाबतही प्रश्न आहेत. 

तीळ पिकाची पेरणी १८-२० वर्षांपूर्वी सुमारे पाच ते सात हजार हेक्टरवर केली जात होती. परंतु हळूहळू पेरणीबाबत शेतकऱ्यांचा कल बदलला. कमी उत्पादन, दुष्काळ, कमी दर, बाजारपेठेची समस्या आदी कारणांमुळे पेरणी घटत गेली. क्षेत्र वाढलेच नाही. उन्हाळी तीळदेखील अत्यल्प क्षेत्रात असते. खरिपातील तीळही ५०० हेक्टरवर खानदेशात नसते. जळगाव जिल्ह्यात सुमारे २३० हेक्टरवर पेरणी झाली आहे.

धुळे व नंदुरबारातही क्षेत्र कमी आहे. बियाणे महाग असल्याने अनेक शेतकरी पेरणी करीत नाहीत. या तुलनेत कापूस पीक परवडते, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करतात. 

पारोळा, अमळनेर, भडगाव, धुळ्यातील शिंदखेडा, नंदुरबार आदी भागातील हलक्या, मुरमाड जमिनीत तीळ पेरणी अपवादानेच केली जाते. जळगाव जिल्ह्यात बेवडसाठी रावेर, यावल, चोपडा, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव आदी भागात काही शेतकरी पेरणी करतात. 

उत्पादन खर्चाच्या तुलनेत नफा कमी 

पेरणी क्षेत्रात वाढीसाठी कृषी विज्ञान केंद्र, तज्ज्ञ, संशोधन केंद्र आदी प्रयत्नशील आहेत. परंतु त्यात फारसे यश आलेले नाही, असेही दिसत आहे. तीळ पिकाचा उत्पादन खर्च जेवढा आहे, त्या तुलनेत नफा कमी आहे, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करतात. शिवाय, कमी पाऊस किंवा अतिपावसात पिकाची मोठी हानी होते. त्यात पीक १०० टक्के वाया जाऊन मोठे नुकसान सहन करावे लागते, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com