agriculture news in Marathi, session of draksh bagayatdar sangh from 3 august in Pune, Maharashtra | Agrowon

द्राक्ष बागायतदार संघाचे पुण्यात ३ ऑगस्टपासून अधिवेशन
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

नाशिक/पुणे : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे ५९ वे वार्षिक अधिवेशन शनिवार (ता. ३) ते सोमवार (ता. ५) या दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे होणार आहे. शनिवारी सकाळी १२ वाजता भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. 

नाशिक/पुणे : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे ५९ वे वार्षिक अधिवेशन शनिवार (ता. ३) ते सोमवार (ता. ५) या दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे होणार आहे. शनिवारी सकाळी १२ वाजता भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. 

या कार्यक्रमास राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (गुरुग्राम, हरियाना)चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अरिझ अहमद, भारतीय कृषी संशोधन परिषद (कृषी विस्तार) उपसंचालक डॉ. ए. के. सिंग, उपसंचालक (उद्यानविद्या) डॉ. आनंद कुमार सिंग, राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे हे प्रमुख पाहुणे असतील. 

संघाच्या ५९ व्या वार्षिक अधिवेशनात ‘द्राक्ष व्यवस्थापन वार्षिक परिसंवाद’मध्ये ५ तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये द्राक्ष उत्पादन ते निर्यात क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर उपस्थित राहणार असून, मार्गदर्शन करणार आहेत. उद्‍घाटनाच्या दिवशी सकाळी १० ते १२ दरम्यान चर्चासत्र होईल, त्यानंतर उद्‍घाटन कार्यक्रम असेल. नंतर पुन्हा चर्चासत्रे सुरू होतील.

पहिल्या तांत्रिक सत्रात ‘माती, पाणी, खत व्यवस्थापन’ दुसऱ्या तांत्रिक परिसंवादात ‘द्राक्ष बागांचे व्यवस्थापन’ तिसऱ्या तांत्रिक सत्रात ‘रोग व कीड व्यवस्थापन’ चौथ्या तांत्रिक सत्रात ‘द्राक्ष काढणी व निर्यात’ व पाचव्या तांत्रिक सत्रामध्ये ‘द्राक्षबाग व्यवस्थापन’ या विषयांतर्गत निर्यात आणि देशी बाजारपेठेसाठी द्राक्षाचा दर्जा या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. इंदू सावंत व त्यांचे सहकारी शास्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

सदर अधिवेशनात विविध तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण यांची मांडणी करण्यात येणार असून, या महत्त्वपूर्ण चर्चासत्राचा सर्व द्राक्ष बागाईतदार यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष शिवाजी पवार, खजिनदार कैलास भोसले, मध्यवर्ती विज्ञान समिती अध्यक्ष अरविंद कांचन यांनी केले आहे. 

अांतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञ करणार मार्गदर्शन 

विषय   तज्ज्ञ
चोपण जमिनीतील पाणी व्यवस्थापन डॉ. डेविड मिर्जाही (इस्राईल)
स्फुरद व खतांचे व्यवस्थापन  डॉ. डेव्ह पिन्क्सटेरॉन (बेल्जियम)
अजैविक ताणांचे जैविक उत्प्रेरकामार्फत व्यवस्थापन डॉ. जोस नालास्को (जर्मनी)
रोग व कीडनाशकांचा योग्य वापर डॉ. नतालिया मुनोज (जर्मनी)
द्राक्षामधील बुरशीनाशकांचे उर्वरित अंशविरहित रोगनियंत्रण करण्याची रणनीती  डॉ. एस. डी. सावंत (कुलगुरू, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

 

इतर अॅग्रो विशेष
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...
कृषी निर्यातीला धोरणात्मक पाठबळ हवे :...जागतिक स्तरावर कृषी निर्यातीत भरपूर संधी आहे,...
शेतकऱ्यांसाठी निवडणुका फक्त...देशात असो किंवा राज्यात ज्या वर्षात निवडणुका...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
‘मिरॅकल बीन’चा लुप्त होतोय चमत्कारदोन दिवसांपासून ढगाने व्यापलेल्या आकाशाने...
स्वस्त थाळी शेतकऱ्यांना पडू शकते महागातशिवसेनेच्या जाहीरनाम्यातील, त्यांच्या शब्दात ''...
नारळ, सुपारीत फुलली दर्जेदार काळी मिरीरत्नागिरी जिल्ह्यात पावसापासून काही अंतरावरील...
नागपूरच्या बाजारात भाव खाणारी सावळीची...बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने विविध...
संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीच्या हालचालीपुणे : बाजार समित्यांच्या जोखडातून शेतीमालाची...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे: अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर...
‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे थाटात...सोलापूर : ‘सकाळ ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी...
२०१९ पशूगणना : गायींची संख्या १८...पुणे ः देशात २०१२ मध्ये ५१२ दशलक्ष पशुधन होते....
कर्जमाफीच्या गोंधळामुळे सोसायट्या संकटातसांगली ः कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही....
मुद्रांक शुल्कात आठशे कोटींनी घटसोलापूर : मुद्रांक शुल्कातून २७ हजार कोटींच्या...