agriculture news in marathi, setback of October hit to jalgaon, Maharashtra | Agrowon

‘आॅक्टोबर हीट’चा जळगावला तडाखा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

पुणे : कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र उघडीप असल्याने तापमानाचा पारा ३५ अशांच्या वर सरकला आहे. राज्याला ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा बसत असून, रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर बुधवारपासून (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र उघडीप असल्याने तापमानाचा पारा ३५ अशांच्या वर सरकला आहे. राज्याला ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा बसत असून, रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर बुधवारपासून (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

कोकण पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जवळपास आठवडाभरापासून वादळी वाऱ्यांसह पाऊस पडत आहे. सकाळपासून उन्हाचा चटक्यामुळे उकाडा वाढून दुपारी ढग गोळा होत, सायंकाळी आणि रात्री जोरदार सरी कोसळत आहेत. तर उर्वरीत महाराष्ट्रात मुख्यत: कोरडे हवामान असल्याने सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदले जात आहे. जळगावसह, बीड, मालेगाव, अकोला येथे तापमान ३६ अंशांवर, तर सोलापूर, परभणी, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले अाहे.

कर्नाटकच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. या भागात शनिवारपर्यंत (ता. ६) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत असून, त्याची तीव्रता वाढणार आहे. यातच नैऋत्य बंगालच्या उपसागरापासून पूर्वमध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. बुधवारपासून (ता.३) दक्षिण काेकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

रविवारी (ता.३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.६, जळगाव ३७.०, कोल्हापूर ३१.६, महाबळेश्‍वर २५.७, मालेगाव ३६.०, नाशिक ३२.५, सांगली ३१.०, सातारा ३१.७, सोलापूर ३५.८, सांताक्रुज ३२.२, अलिबाग ३१.६, रत्नागिरी ३३.५, डहाणू ३२.४, आैरंगाबाद ३४.४, परभणी ३५.४, नांदेड ३४.०, बीड ३६.४, अकोला ३५.९, अमरावती ३४.६, बुलडाणा ३१.१, ब्रह्मपुरी ३५.५, चंद्रपूर ३५.२, गोंदिया ३४.०, नागपूर ३५.२, वर्धा ३५.०, यवतमाळ ३५.५.

रविवार (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - कृषी विभाग) : 
कोकण : मालगुंड २५, तरवल ३७, पाली २६, तुलासणी ३१, म्हाबळे ३२, राजापूर ५६, कोंडेया ४१, कुंभवडे २८, पाचळ २०, शिरगाव २७, पाटगाव २४. 
मध्य महाराष्ट्र : अंबवणे २३, कुडे ३२, कडूस ३४, निंबार्गी २०, विंचूर ३४.

माॅन्सूनची आणखी माघार शक्य
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) शनिवारी (ता. २९) परतीच्या प्रवासाला सुरवात केली आहे. पश्‍चिम राजस्थान, कच्छचा काही भाग, उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे. मंगळवारपर्यंत (ता. २) राजस्थानचा उर्वरीत भाग, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि अरबी समुद्राच्या आणखी काही भागातून मॉन्सून माघारी फिरण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले अाहे.

इतर अॅग्रो विशेष
संघर्षमय हंगामगेल्या वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात विक्रमी...
द्राक्ष शेतीला चालना कशी मिळेल?संपूर्ण भारत देशामध्ये द्राक्ष लागवड १.३९ लाख...
जमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...
धक्कादाय ! चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...
शेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात...पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब...
फूलशेती देऊ शकते का उत्पन्नाचा हमखास...अकोला जिल्ह्यातील कंझरा येथील अमृतराव दलपतराव...
पुदिना उत्पादनात रवी करंजकरांची मास्टरी...मुंबईत पुदिन्यात ‘गुडवील’ मिळविलेले करंजकर नाशिक...
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...