‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी  सर्वतोपरी मदत करणार ः शरद पवार 

स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क तसेच इतर कर कमी करणे, महाबळेश्वर येथे ‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठीसर्वतोपरी मदत करणार असल्याचे खासदार शरद पवार यांनी सांगितले.
For setting up ‘Berry’s Excellence Center’ Will help the most: Sharad Pawar
For setting up ‘Berry’s Excellence Center’ Will help the most: Sharad Pawar

सातारा ः स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क तसेच इतर कर कमी करणे, महाबळेश्वर येथे ‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी व स्ट्रॅाबेरी रोपांचा अलगीकरण कालावधी पूर्वी प्रमाणेच ३ ते ४ महिने करण्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा तसेच सर्वतोपरी मदत करणार असल्याचे खासदार शरद पवार यांनी सांगितले.  सातारा जिल्हा बँक नेहमीच शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्यरत आहे. याचाच एक भाग म्हणून स्ट्रॅाबेरी पिकाचे आयात शुल्क कमी होणेसाठी व बेरी पीक लागवडीस चालना मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनेतून महाबळेश्वर येथे ‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी स्ट्रॅाबेरी ग्रोवर्स असोसिएशन व जिल्हा बँकेच्या यांच्या वतीने बँकेचे संचालक आमदार मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी पवार यांना निवेदन दिले. त्या वेळी ते बोलत होते.  महाबळेश्वर व लगतचे तालुक्यातील स्ट्रॅाबेरी प्रमुख नगदी पीक असून, तीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॅाबेरी केली जाते. शेतकऱ्यांना लागवडीसाठी स्ट्रॅाबेरी पिकाची (मदर प्लॅन्ट) स्विट चार्ली, कॅमारोझा व विंटर डाऊन या जातींची रोपे आयात करावी लागतात. आयात शुल्क व इतर कर वाढल्याने रोपे खरेदी व उत्पादन खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो आहे. सातारा जिल्हा बँक नेहमीच शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्यरत आहे. याचाच एक भाग म्हणून स्ट्रॅाबेरी पिकाचे आयात शुल्क कमी होणेसाठी व बेरी पीक लागवडीस चालना मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनेतून महाबळेश्वर येथे ‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.  पवार म्हणाले, ‘‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नावलौकीक देशभर असून, बँकिग कामकाजाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत विकासाभिमुख केलेले कामकाज हे देशातील सहकारी बँकांसाठी आदर्शवत आहे. स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क तसेच इतर कर कमी करणे, महाबळेश्वर येथे ‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी व स्ट्रॅाबेरी रोपांचा अलगीकरण कालावधी पूर्वी प्रमाणेच ३ ते ४ महिने करणेसाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा तसेच सर्वतोपरी मदत करणार आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com