Agriculture News in Marathi For setting up ‘Berry’s Excellence Center’ Will help the most: Sharad Pawar | Page 3 ||| Agrowon

‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी  सर्वतोपरी मदत करणार ः शरद पवार 

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 नोव्हेंबर 2021

स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क तसेच इतर कर कमी करणे, महाबळेश्वर येथे ‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे खासदार शरद पवार यांनी सांगितले. 

सातारा ः स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क तसेच इतर कर कमी करणे, महाबळेश्वर येथे ‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी व स्ट्रॅाबेरी रोपांचा अलगीकरण कालावधी पूर्वी प्रमाणेच ३ ते ४ महिने करण्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा तसेच सर्वतोपरी मदत करणार असल्याचे खासदार शरद पवार यांनी सांगितले. 

सातारा जिल्हा बँक नेहमीच शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्यरत आहे. याचाच एक भाग म्हणून स्ट्रॅाबेरी पिकाचे आयात शुल्क कमी होणेसाठी व बेरी पीक लागवडीस चालना मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनेतून महाबळेश्वर येथे ‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी स्ट्रॅाबेरी ग्रोवर्स असोसिएशन व जिल्हा बँकेच्या यांच्या वतीने बँकेचे संचालक आमदार मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी पवार यांना निवेदन दिले. त्या वेळी ते बोलत होते. 

महाबळेश्वर व लगतचे तालुक्यातील स्ट्रॅाबेरी प्रमुख नगदी पीक असून, तीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॅाबेरी केली जाते. शेतकऱ्यांना लागवडीसाठी स्ट्रॅाबेरी पिकाची (मदर प्लॅन्ट) स्विट चार्ली, कॅमारोझा व विंटर डाऊन या जातींची रोपे आयात करावी लागतात. आयात शुल्क व इतर कर वाढल्याने रोपे खरेदी व उत्पादन खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो आहे. सातारा जिल्हा बँक नेहमीच शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्यरत आहे. याचाच एक भाग म्हणून स्ट्रॅाबेरी पिकाचे आयात शुल्क कमी होणेसाठी व बेरी पीक लागवडीस चालना मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनेतून महाबळेश्वर येथे ‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

पवार म्हणाले, ‘‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नावलौकीक देशभर असून, बँकिग कामकाजाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत विकासाभिमुख केलेले कामकाज हे देशातील सहकारी बँकांसाठी आदर्शवत आहे. स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क तसेच इतर कर कमी करणे, महाबळेश्वर येथे ‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी व स्ट्रॅाबेरी रोपांचा अलगीकरण कालावधी पूर्वी प्रमाणेच ३ ते ४ महिने करणेसाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा तसेच सर्वतोपरी मदत करणार आहे.’’


इतर अॅग्रो विशेष
जैव उत्तेजक उत्पादने  नोंदणीचा घोळात...पुणे ः राज्यातील जैव उत्तेजकांच्या यादीतील...
कृषी योजनांसाठी अर्जांचा ओघ सुरुचनगर ः कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, सिंचन साधने व...
निर्यातीसाठी गुणवत्तापूर्ण  हळद...हिंगोली ः हळद निर्यातीत महाराष्ट्राचा मोठा वाटा...
पशुसंवर्धन विभागाची यंत्रणाच आजारी अमरावती : सरकारकडून शेतीपूरक पशुपालनासाठी...
पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या उरकल्यापुणे : गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार...
जमीन सुपीकता, पीक फेरपालट हेच सूत्रअनियंत्रित पाणी, खतमात्रा वापरामुळे जमीन सुपीकता...
‘मध क्लस्टर’ निर्मितीसाठी सर्वतोपरी मदत...नाशिक : मधमाशीपालन हे अतिरिक्त रोजगाराचे साधन...
विलंब ‘एफआरपी’चे व्याज  कारखान्यांना...नांदेड : शेतकऱ्यांसोबत बेकायदा करार करून एफआरपीचे...
सोयाबीनसाठी चीनची अमेरिकेवर मदार? पुणे ः ब्राझील आणि अर्जेंटिनात यंदा सोयाबीन...
राज्यात गारठा पुन्हा वाढणार पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...
महावितरण विरोधात कऱ्हाडमध्ये शुक्रवारी...कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांना बोगस, चुकीची...
द्राक्ष दराच्या निर्णयाची अंमलबजावणी...नाशिक : निर्यातक्षम द्राक्ष मालाच्या उत्पादन...
यंदा डाळिंब निर्यातदार  शेतकरी...सांगली ः राज्यातून डाळिंबाची निर्यात वाढण्यासाठी...
फळबाग लागवडीसाठी  आता सुधारित योजना पुणे ः फलोत्पादन वाटचालीत रोहयो फळबाग लागवडीनंतर...
कोविडमुक्त गाव अभियान पुणे विभागातही...पुणे : जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने...
ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामांबाबत...अकोला ः राज्यातील ग्रामसेवकांकडे असलेली अतिरिक्त...
दळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवासतळोदा, जि. नंदुरबार : सातपुड्यातील सावऱ्या दिगर...
वाळूदर येतील आवाक्यात  लिलाव कालावधी...मुंबई : राज्यात वाळूचा मुबलक पुरवठा आणि दरांमध्ये...
नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...
तेलकट डागविरहित डाळिंब अन् बारमाही...तेलकट डाग, सूत्रकृमी किंवा अन्य कारणांमुळे...