agriculture news in marathi, Setting up of 100 belly bridge in Gadchiroli: Chief Minister | Agrowon

गडचिरोलीत १०० बेली ब्रिज उभारणार : मुख्यमंत्री

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

गडचिरोली : गडचिरोली हा नद्यांचा जिल्हा आहे. परिणामी पावसाळ्यात पूर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे जिल्ह्याशी संपर्क तुटणाऱ्या ८२ गावांत तात्पुरत्या स्वरूपाचे १०० बेली-ब्रिज उभारले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

गडचिरोली : गडचिरोली हा नद्यांचा जिल्हा आहे. परिणामी पावसाळ्यात पूर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे जिल्ह्याशी संपर्क तुटणाऱ्या ८२ गावांत तात्पुरत्या स्वरूपाचे १०० बेली-ब्रिज उभारले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

गडचिरोली येथे प्रमुख पुलांचे उद्‌घाटन, महामार्गाचे ई-भूमिपूजन व लाभार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम सोमवारी (ता. १८) फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षथानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार रामदास आंबटकर, खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, पालकमंत्री अंम्ब्रीशराव आत्राम, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, ‘‘गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच गडचिरोलीला विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. माज्यासह गडकरी यांनी संधी मिळेल, त्यानुसार गडचिरोलीचा दौरा केला. या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हे शासन कटीबद्ध आहे. जिल्ह्यात मुबलक पाणी आहे. मात्र वनसंपदेमुळे मोठे सिंचन प्रकल्प उभारता येत नाहीत. त्यामुळे गेल्या चार वर्षांत ११ हजार विहिरी मंजूर करण्यात आल्या. विहिरी, शेततळे, छोटे पूल, बंधारे आदीच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.‘‘

‘‘मोटरपंप, वीज जोडणी नियमित मिळेल याकडे लक्ष वेधले आहे. पावसाळ्यात या जिल्ह्यातील संपर्क तुटणाऱ्या गावांना बेली ब्रिजद्वारे जोडण्यात येईल. या गावांचा विकास थांबता कामा नये. सोबतच जिल्ह्यातील गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती या नद्यांवरील पुलांचे काम लवकरच पूर्णत्वास येईल,‘‘ असेही फडणवीस यांनी सांगितले.


इतर बातम्या
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...
विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
नुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...
खानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
नगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...
जळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव  ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...
नगर जिल्ह्यात सरासरीच्या ३१ टक्के...नगर : जिल्ह्यामध्ये यंदा चांगला पाऊस झाल्याने...