सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात छावण्या उभारू :दुष्काळग्रस्तांचा इशारा

सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात छावण्या उभारू :दुष्काळग्रस्तांचा इशारा
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात छावण्या उभारू :दुष्काळग्रस्तांचा इशारा

सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव तालुक्‍यातील कलेढोण व कुकुवाड आदी ३२ गावांना पाणी द्यायला हवे. याबाबत एक महिन्यांच्या आत शासनाने कार्यवाही करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात चारा छावणी सुरू करू. तरीही पाणीप्रश्‍न सुटला नाही, तर येत्या निवडणुकांवर ही गावे बहिष्कार टाकतील, असा इशारा दुष्काळग्रस्तांनी शुक्रवारी (ता.२१) पत्रकार परिषदेत दिला.

या गावांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दत्तक घेतलेल्या संसद गाव एनकूळचाही समावेश आहे. सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे, चिन्मय कुलकर्णी, दीपक खताळ, संजीव साळुंखे, अनिल भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थितीत होते.

गारळे म्हणाले, "खटाव तालुक्‍यातील कलेढोण, गारुडी, तरसवाडी, गारळेवाडी, विखळे, मुळीकवाडी, ढोकळवाडी, पाचवड, हिवरवाडी, कानकात्रे, पडळ, खातवळ, एनकूळ, कणसेवाडी, दातेवाडी, कुकुडगाव गणातील उकळेवाडी, कंदीनगर, मानेवाडी, आगासवाडी, म्हसकरवाडी, धनवडेवाडी, कारंडवाडी, चिलारवाडी, कापूसवाडी, लाडेवाडी, शेळकेवस्ती, भाकरेवाडी, शिवाजीनगर, विरळी, बागलेवाडी आदी गावे वर्षांनुवर्षे दुष्काळी स्थितीत आहेत.‘‘

‘‘टेंभू प्रकल्पातून या गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी देणे शक्‍य आहे. टेंभू योजनेचा कालवा कलेढोण, गारळेवाडी सीमेवरून गेला आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर व आटपाडी तालुक्‍यांतील गावांना व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍यातील गावातील लाभक्षेत्रात होत आहे. टेंभू प्रकल्पाच्या पाणीवाटपात खटाव तालुक्‍यातील या गावांवर अन्याय झाला आहे. शासनाने लक्ष घालून हा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडवावा. आटपाडी पॅटर्नप्रमाणे पाइपलाइनद्वारे हे पाणी दिले जावे. त्यामुळे भूसंपादनाची आवश्‍यकता भासणार नाही,'' असेही गारळे म्हणाले.

साळुंखे म्हणाले, "साताऱ्यात धरणे असून खटाव तालुक्‍याला पाणी मिळत नाही. सध्या या गावांना पाणी देण्यासाठी सर्व्हे सुरू आहे. त्याबाबत एका महिन्यात निर्णय घ्यावा. ''

भोसले म्हणाले, "टेंभूच्या पाण्यासाठी आमचा लढा सुरू आहे. हे शासन आम्हाला पाणी देऊ शकते. तरीही त्यासाठी जन उठाव होणे आवश्‍यक असल्याने आम्ही आता पाणी मिळेपर्यंत मागे न हटण्याचे ठरविले आहे.'' " एक महिन्यात हा विषय मार्गी लागला नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयात चारा छावणी सुरू करू,‘‘ असे कुलकर्णी यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com