पीककर्जाची प्रकरणे तत्काळ मार्गी लावा : कृषिमंत्री भुसे

नाशिक ः ‘‘जिल्हा बँकेत दाखल पीक कर्जाची प्रकरणे तत्काळ मार्गी लावा,’’ असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.
Settle crop loan cases immediately: Agriculture Minister Bhuse
Settle crop loan cases immediately: Agriculture Minister Bhuse

नाशिक ः ‘‘छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अनुषंगाने जिल्हा बँकेला वितरित १२२ कोटीच्या अनुदानापैकी किमान १०० कोटीचे पीककर्ज एक आठवड्यात वितरित करा. जिल्हा बँकेत दाखल पीक कर्जाची प्रकरणे तत्काळ मार्गी लावा,’’ असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.

मालेगाव येथे शासकीय विश्रामगृहात सोमवारी (ता.२३) आयोजित सर्व बँक अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमहापौर नीलेश आहेर, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पिंगळे, मालेगावचे विभागीय अधिकारी एम.टी.डंबाळे, पंचायत समिती सदस्य भगवान मालपुरे उपस्थित होते.

भुसे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांची फरपट, विनावाटप पडून असणारे शासकीय अनुदान, महिला शेतकऱ्यांसह बचत गटांना असहकार्य याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. ही निश्चितच असमाधानकारक बाब असून ती खपवून घेणार नाही. पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची एकाच वेळी पूर्तता करावी, त्यांना वारंवार बँकेत फेऱ्या मारण्याची वेळ येता कामा नये. दाखल प्रकरणे मार्गी लावा. ’’

कर्जमाफीसाठी तांत्रिक अडचणींमुळे जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असतील, त्यांची तपशीलवार माहिती सर्व बँकांनी सादर करावी. अशा शेतकऱ्यांचा शासन स्तरावर पाठपुरावा करून लाभ मिळवून देऊ. महिला बचत गटांना पतपुरवठा न केल्याने ते खाजगी पतपुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडे वळत आहेत. महिला बचतगटांना सक्षम करण्यासाठी सर्व बँकांनी प्राधान्याने पतपुरवठा करावा, असेही भुसे म्हणाले. 

जिल्हा बँकेच्या कामकाजावर नाराजी 

शेतकऱ्यांचे १२२ कोटीचे कर्जमाफीचे अनुदान जिल्हा बँकेला वितरित करण्यात आल्यानंतर केवळ ८ हजार ९२०  शेतकऱ्यांना ४६ कोटी ४५ लाखांचे पीक कर्ज जिल्हा बँकेने वितरित केले. जिल्हा बँकेबाबत भुसे यांनी नाराजी व्यक्त केली. पीककर्जापोटी किमान १०० कोटींची रक्कम वाटप करण्याचे निर्देश जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक पिंगळे यांना दिले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com