agriculture news in marathi Sevagram development program work inauguration today by CM Uddhav Thackraey | Agrowon

सेवाग्राम विकास आराखड्यातील कामाचे आज ई-लोकार्पण

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ वी जयंतीच्या निमित्ताने सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत झालेल्या कामाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (ता.२) ई-लोकार्पण होणार आहे.

वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ वी जयंतीच्या निमित्ताने सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत झालेल्या कामाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (ता.२) ई-लोकार्पण होणार आहे.

यावेळी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, अपर मुख्य सचिव नियोजन देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, खासदार विकास महात्मे, खासदार रामदास तडस, आमदार नागो गाणार, डॉ. रामदास आंबटकर, रणजित कांबळे, दादाराव केचे, समीर कुणावार, डॉ. पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, सेवाग्रामचे सरपंच सुजाता ताकसांडे, वरुडचे वासुदेव देवढे व पवनारचे शालीनी आदमने यांची उपस्थिती असणार आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीच्या निमित्ताने २ ते ८ ऑक्टोंबर या कालावधित जिल्हा प्रशासनाचे वतीने सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताह दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत झालेल्या कामाचे २ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या नवीन सभागृहात लोकार्पण होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात मर्यादित मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जिल्हा माहिती कार्यालय, डिजीआयपीआर, मुबंई आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेसबुक पेज वरून होणा-या थेट प्रेक्षपणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे.

पदयात्रेचे आयोजन
पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार व मर्यादीत मान्यवरांच्या उपस्थितीत २ ऑक्टोंबर ला सकाळी ७ वाजता वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाचे वतीने गांधी पुतळा ते सेवाग्राम आश्रम पर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांनतर सकाळी १० वाजता जिल्हा न्यायालयासमोरील हॉकर प्लाझा येथील स्टॉलचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

सायंकाळी ६ वाजता महात्मा गांधी विश्वविद्यालय येथे गांधी दीपोत्सव, ३ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या सभागृहात गांधी विचारधारेवर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानमालेत खासदार कुमार केतकर, टी.आर.एन.प्रभू, विजय दिवान, डॉ. पुष्पिता अवस्थी, महात्मा गांधी विश्व विद्यालयाचे कुलगुरू रजनीश शुक्ल, डॉ. जव्हार मार्गदर्शन करणार आहे. ४ ऑक्टोबरला महिला बचत गटांच्या कार्याबाबत जिल्हास्तरीय वेबिनार, ५ ऑक्टोबरला एमगीरीच्या सभागृहात सकाळी ९ ते सायंकाळी ५.१५ दरम्यान ग्रामीण अर्थव्यवस्था सशक्तीकरणाकरीता एमगीरीव्दारा विकसित तंत्रज्ञानावर आधारित जनजागृती कार्यक्रम व उद्योजकता कार्यक्रम.

६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या सभागृहात श्रमाची प्रतिष्ठा कार्यक्रम, ७ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता संपूर्ण जिल्हाभर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. ८ ऑक्टोबरला विश्व हिंदी विद्यापीठ येथे सकाळी ११ वाजता आंतरराष्ट्रीय वेबिनार, मंगल प्रभात पुस्तकाचा संस्कृत अनुवाद तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचेवर आधारित पुस्तकाचे अनावरण होणार आहे.

कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या वतीने निवडक गावांमध्ये आरोग्य विषयक कार्यक्रम. एमगिरीच्या रेडिओ केंद्रावरून महात्मा गांधी यांच्या जीवनातील महत्त्वाची तत्त्वे या विषयावर सकाळी १५ मिनिटे व सायंकाळी १५ मिनिटे कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


इतर बातम्या
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यताभंडारा : खरीप हंगामातील धान केंद्र सुरू...
आम्ही तुमच्यासोबत: मुख्यमंत्रीसोलापूर ः सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन...
कृषी विद्यापीठ कर्मचारी करणार वेतन...नागपूर: सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
राज्याने जबाबदारी झटकू नये: देवेंद्र...बारामती, जि. पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगातकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने...
आटपाडी तालुक्यात चार वेळा अतिवृष्टीआटपाडी, जि. सांगली : बॅंका, विकास सेवा सोसायट्या...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा...मुंबई: डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
संत्रापट्ट्यासाठी अनुदानाचे निकष बदलाअमरावती : संत्राबाग कीड-रोग रोगमुक्त ठेवण्यासाठी...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
अकोल्यात ज्वारीच्या कणसातून निघाले कोंबअकोला ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल...
जळगावात खपली गहू पेरणी वाढणारजळगाव ः आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून...
अकोट येथे उडीद पिकाची प्रतिकात्मक होळीअकोला ः पावसाने पिकांची दाणादाण उडविली आहे....
खानदेशात सोयाबीनचे अनेक शेतकऱ्यांना...जळगाव ः खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा बऱ्यापैकी...