साडेसात हजार खात्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले

नांदेड : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील कर्जमुक्तीस पात्र सात हजार ६८१ शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आधार प्रमाणिकरण केलेले नाही. अशा शेतकऱ्यांनी सेतू केंद्रावर जाऊन तत्काळ आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे.’’
Of seven and a half thousand accounts Aadhaar authentication stalled
Of seven and a half thousand accounts Aadhaar authentication stalled

नांदेड : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील कर्जमुक्तीस पात्र सात हजार ६८१ शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आधार प्रमाणिकरण केलेले नाही. अशा शेतकऱ्यांनी सेतू केंद्रावर जाऊन तत्काळ आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे’’, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अनिल चव्हाण यांनी केले.

या योजनेंतर्गत एकूण दोन लाख १४ हजार ४९१ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र आहेत. त्यापैकी बँकांनी दोन लाख सात हजार ३६ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. या बँकांनी अपलोड केलेल्या माहितीपैकी शासनाने कर्जमाफी पात्र असणाऱ्या एक लाख ९४ हजार २१६ शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली. त्यापैकी एक लाख ८६ हजार ५३५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण केली आहे.

आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांपैकी एक लाख ७९ हजार ६२८ शेतकऱ्यांच्या खात्यांत कर्जमाफीची रक्कम एक हजार २२९ कोटी जमा करण्यात आले आहेत. उर्वरित आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्याच्या खात्यांत शासनामार्फत लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. 

आधार प्रमाणीकरण शिल्लक शेतकऱ्यांनी सेतू केंद्रावर जाऊन तत्काळ आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हा व तालुकास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत, अशांनी आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून तक्रार निकाली काढून घ्याव्यात. - अनिल चव्हाण, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), देड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com