चिपळूणात साडेसात हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

पावसाने चिपळूण तालुक्यातील साडेसात हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसात १ हजार ३३६ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागामार्फत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईपोटी सुमारे ८४ लाख अनुदानाची गरज आहे. या अनुदानाची मागणी शासनाकडे केली असल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.
Seven and a half thousand farmers hit rain in Chiplun
Seven and a half thousand farmers hit rain in Chiplun

रत्नागिरी ः परतीच्या पावसाने चिपळूण तालुक्यातील साडेसात हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसात १ हजार ३३६ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागामार्फत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईपोटी सुमारे ८४ लाख अनुदानाची गरज आहे. या अनुदानाची मागणी शासनाकडे केली असल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.

गतवर्षीप्रमाणे यावर्षीही परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले. हातातोंडाशी आलेल्या भातशेतीची या पावसामुळे प्रचंड नासाडी झाल्याने शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे. या नैसर्गिक आपत्तीतून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी, यासाठी काही दिवसांपूर्वी आमदार शेखर निकम यांनी सावर्डे येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

कृषी व महसूल विभागांना तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार तालुक्यात ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांच्यामार्फत पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. तालुक्यात पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार तब्बल ७ हजार ४५९  शेतकऱ्यांचे या परतीच्या पावसाने नुकसान केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ७ हजार ४५८ शेतकऱ्यांचे १ हजार ३३६.३१ हेक्टर जिरायती क्षेत्र बाधित झाले आहे. तर एका शेतकऱ्याचे ०.४० हेक्टर बागायती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. एकूण १ हजार ३३६.७१ हेक्टर क्षेत्र या परतीच्या पावसामुळे बाधित झाले आहे.

या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी ८४ लाख ४०५ रुपयांची अंदाजित अनुदानाची गरज आहे. या संदर्भातील तहसीलदार जयराज सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी अडाके, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांच्या स्वाक्षरीने वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला आहे.

एप्रिल महिन्यात वादळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले; मात्र त्याची नुकसान भरपाई शासनाकडून अद्याप देण्यात आलेली नाही. ‘निसर्ग’ वादळातील भरपाई मात्र तातडीने मिळाली. परतीच्या पावसात राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी लवकरच मदत देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे भरपाई कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com