Agriculture news in Marathi Seven 'corona' patients in Akola in a single day | Agrowon

अकोल्यात एकाच दिवसात सात ‘कोरोना’ रूग्ण

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

अकोला ः जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या नऊवर जाऊन पोचली तर बुलडाण्याचाही आकडा १५ झाला आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात गुरुवारी (ता. नऊ) पातूर शहरात सात जण ‘कोरोना’ बाधित असल्याचे स्पष्ट झाले. तत्पूर्वी बुधवारी (ता. आठ) अकोल्यात शहरात दुसरा ‘कोरोना’ बाधित रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण अकोला शहरातील अकोट फैल भागातील रहिवासी आहे. 
 

अकोला ः जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या नऊवर जाऊन पोचली तर बुलडाण्याचाही आकडा १५ झाला आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात गुरुवारी (ता. नऊ) पातूर शहरात सात जण ‘कोरोना’ बाधित असल्याचे स्पष्ट झाले. तत्पूर्वी बुधवारी (ता. आठ) अकोल्यात शहरात दुसरा ‘कोरोना’ बाधित रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण अकोला शहरातील अकोट फैल भागातील रहिवासी आहे. 

गेल्या २४ तासांत १३ जण संशयित रुग्ण म्हणून दाखल झाले. त्यांचे घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आत्तापर्यंत १३६ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी ९० जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ८८ निगेटिव्ह आहेत. पातूर मधील सात रुग्णांचा संपर्क वाशीम जिल्ह्यातील रुग्णांसोबत आला होता. हा रुग्ण अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे सहा दिवस थांबला होता. त्या काळात पातूर येथील हे सात जण भेटून आले होते. एकाच शहरातील सात जणांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

प्रशासन ॲक्शन मोडवर
‘कोरोना’ बाधितांचा आकडा दर दिवसाला वाढत चालला असल्याने आता नागरिकांना बाहेर फिरण्यापासून रोखण्यासाठी ॲक्शन मोडवर आले आहे. या अनुषंगाने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. बँक व्यवहाराचा कालावधी सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत ठेवण्यात आला असून जीवनावश्‍यक वस्तूंची दुकानेही आता १२ वाजेपर्यंतच उघडी ठेवली जात आहेत.

बुलडाण्याची संख्या १५ वर
जिल्ह्यात तीन जणांचे अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले. यामुळे आता एकूण ‘कोरोना’ बाधितांची संख्या १५ झाली आहे. यापैकी एकाचा २९ मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर गुरुवारी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यातील दोघे शेगाव व एक जण खामगाव तालुक्यातील आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...