agriculture news in marathi Seven crore ninety seven lakh quintal sugar production in state | Agrowon

राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

ॲग्रोवन वृत्तसेवा
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे. राज्यात यंदा सहकारी व खासगी मिळून १८६ साखर कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत राज्यात तब्बल सात कोटी ८१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.

नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे. राज्यात यंदा सहकारी व खासगी मिळून १८६ साखर कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत राज्यात तब्बल सात कोटी ८१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. ऊस गाळपात सुरुवातीपासूनच कोल्हापूरची आघाडी आहे. नगर विभागात चौथ्या क्रमांकावर आहे. यंदा आतापर्यंत ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे यंदा उत्पादन झाले आहे. अजून किमान दोन कोटी टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. 

राज्यात यंदा ९४ सहकारी व ९२ खासगी असे १८० साखर कारखान्यांकडून  उसाचे गाळप केले जात आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा दोन कोटींपेक्षा टनापेक्षा अधिक ऊस आहे. आतापर्यंत राज्यात ७ कोटी ८१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. कोल्हापूर विभागात सर्वाधिक १ कोटी ८८ लाख टन, त्यापाठोपाठ पुणे विभागात १ कोटी ७० लाख ६४ हजार, सोलापूर विभागात १ कोटी ६२ लाख ५७ हजार तर नगर विभागात १ कोटी १६ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. औरंगाबादला ६६ लाख, नांदेडला ६९ लाख, अमरावतीला ५ लाख तर नागपुरला ३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यात तब्बल ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. 

राज्यात दर दिवसाची उसाची गाळप क्षमता ८ लाख ६० हजार ९८० एवढी आहे. मात्र दर दिवसाला ५ लाख ४८ हजार ११२ टन उसाचे गाळप होत आहे. राज्याचा विचार करता दर दिवसाला ऊस गाळपात तीन लाख टनाने कमी होत आहे. अजून साधारण दोन कोटी टन उसाचे गाळप होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात  आले. 

  • नगर विभागात एक कोटी १६ लाख टन  गाळप
  • कोल्हापुरात सर्वाधिक १ कोटी ८८ लाख टन गाळप
  • राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन  
  • अजून किमान दोन कोटी टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज

इतर बातम्या
खतांची दरवाढ नाहीपुणे : रासायनिक खतांच्या किमतींमध्ये कोणत्याही...
खरिपाचे गावनिहाय नियोजन ः कृषिमंत्रीकोल्हापूर ः खरिपाचे नियोजन गावातच करण्यासाठी...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
राज्यात कृषिपंपधारकांकडून १,१६० कोटींचा...कोल्हापूर : कृषिपंप वीज धोरण योजनेअंतर्गत ११ लाख...
पूर्व भारताच्या विकासावर भर ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशाचा पूर्व भाग नेतृत्व करत होता,...
‘रोहयो’ शेततळ्यात प्लॅस्टिक...पुणे : रोजगार हमी योजनेतून शेततळे खोदण्यासाठी...
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पंढरपुरात...सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना...
बाजारात गर्दी नियंत्रणासाठी नियमांची...नाशिक : कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातील...
नेरूर येथे नारळ बागेला आगसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील नेरूर कर्याद नारूर (...
जोरदार पावसाची शक्यतापुणे : ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. तसेच...
जळगावात बीटी कापसाच्या २५ लाख पाकिटांची...जळगाव :  राज्यात कापूस लागवडीत आघाडीवर...
दर्यापूर बाजार समितीत सोयाबीनला सात...अमरावती : सोयाबीन दरातील तेजीची घौडादौड कायम असून...
मंत्रिमंडळात विदर्भाचे वजन घटलेनागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख आणि वनमंत्री संजय...
नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी कृषी...कोल्हापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
अकोला जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना...अकोला : एकीकडे केंद्र, राज्य शासन लाभार्थ्यांच्या...
प्राधान्यक्रम एका बाबीला, निवड दुसऱ्याच... नगर : कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी...
दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन...परभणी : दर वाढले म्हणून बियाण्यासाठी राखून...
अवकाळीचा आजपासून अंदाजपुणे : दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत ढगाळ...
सोलापुरात वाढत्या उन्हामुळे शुकशुकाटसोलापूर ः सोलापूर शहर जिल्हयात सध्या उष्ष्णतेची...