Agriculture news in marathi; Seven hundred acres of crops under water at keliweli | Agrowon

केळीवेळीत सातशे एकरांतील पिके पाण्याखाली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

अकोला ः गेले चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे केळीवेळी परिसरातील दोन्ही नाल्यांना पूर वाहिला. भोपळी व लेंडी नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने ७०० एकरांतील पिके धोक्यात आलेली आहेत. 

अकोला ः गेले चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे केळीवेळी परिसरातील दोन्ही नाल्यांना पूर वाहिला. भोपळी व लेंडी नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने ७०० एकरांतील पिके धोक्यात आलेली आहेत. 

केळीवेळी येथील भोपळी व लेंडी नाल्याच्या दोन्ही बाजूच्या शेतांमधील खरिपाची पिके खरडून गेली. तर उर्वरित पिके कुजली आहेत. ज्या शेतांमध्ये पाणी साचले आहे त्या ठिकाणी एक महिना शेतीची कामे होण्याची चिन्हे नाहीत. शेतात साचलेले पाणी जमिनीत मुरले तरी पुन्हा पाऊस आल्यास पाणी साचण्याची चिन्हे आहेत. या भीतीपोटी शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. ज्या वर्षी जास्त पाऊस पडतो त्यावर्षी या खारपाण पट्ट्यात हमखास नुकसान होत असते. शेतांमध्ये पाणी साचू नये, यासाठी शासकीय स्तरावरून प्रयत्न होण्याची गरज आहे. सध्या पाणी साचलेल्या शेतांमधील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे.

दुबार पेरणीही मावळली 
केळीवेळी शेतशिवारात पाणी साचलेले असल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या संकटामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. साचलेल्या पाण्यामुळे शेतात असलेली खरिपाची पिके कुजली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पेरणीशिवाय पर्याय उरलेला नाही. परंतु, आता ऑगस्ट सुरू असल्याने दुबार पेरणी करणेही शक्य होणार नसल्याची चिन्हे आहेत. खरिपाचा मोठा कालावधी निघून गेला आहे.

२०१६ ची पुनरावृत्ती
जुलै २०१६ मध्ये या भागात अशाच प्रकारची परिस्थिती उद्भवली होती. तेव्हापासून या शेतकऱ्यांनी तसेच कृषी खात्याने आजपर्यंत कोणतीही उपाययोजना केली नाही. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसुद्धा मिळालेली नाही. 

इतर बातम्या
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...