अतिवृष्टीमुळे मोर्शीतील  ७०० कुटुंबे बाधित

अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करताना डॉ. अनिल बोंडे
अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करताना डॉ. अनिल बोंडे

अमरावती   ः मोर्शी व धारणी तालुक्‍यांतील सात महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. दमयंती नदीचे पाणी मोर्शी शहरात शिरल्याने किमान ७०० कुटुंबे बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्यासह जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर पंचनाम्याचे आदेश दिले. 

जिल्ह्यात धारणी तालुक्‍यात बुधवारी (ता. ४) सकाळपासून जोरदार पावसाला सुरवात झाली. धारणी महसूल मंडळात १०५.२, धूळघाटमध्ये ९६.२, हरिसालमध्ये ११५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मेळघाटात सर्वदूर झालेल्या पावसामुळे गडगा, सिपना, तापी या नद्यांसह खापरा, खंडू व अलई नाले ओव्हरफ्लो झाले. 

हे पाणी अनेक शेतांत साठल्याने पिकांचे नुकसान झाले. गुरुवारी (ता. ५) देखील पाऊस सुरूच असल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहत होते. मोर्शी येथे बुधवारी (ता. ४) जोरदार पाऊस झाला. या महसूल मंडळात १२७ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्याचप्रमाणे शिरखेड येथे ७४, अंबाडा येथे १२०, हिरवखेड मंडळात ९१ मिमी पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे मोर्शी शहरातून वाहणाऱ्या दमयंती नदीला पूर आला. पाणी शहरात शिरल्याने ७०० कुटुंबे बाधित झाल्याने त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांनी पूरग्रस्त भागात भेट देत पंचनाम्याचे आदेश दिले. जिल्ह्यात १ जून ते ५ ऑगस्टदरम्यान ६७१ मिमी पावसाची सरासरी आहे. या वेळी प्रत्यक्षात ६९७.१ मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ८५.६ टक्‍के पाऊस झाला आहे. ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र मोर्शी तालुक्‍यात आहे. या तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने गुरुवारी सायंकाळपर्यंत ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ८९.८७ टक्‍के पाणीसाठा झाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com