agriculture news in Marathi, seven lac rupees cost of fee return,nagpur, maharashtra | Agrowon

परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपये

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

यवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे परत करण्यासाठी तब्बल सात लाख रुपयांचा खर्च लागणार आहे. इतका पोस्टेज खर्च मंजूर करण्याची मागणी यवतमाळ कृषी विभागाने कृषी आयुक्‍तालयाकडे  केली आहे. 

यवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे परत करण्यासाठी तब्बल सात लाख रुपयांचा खर्च लागणार आहे. इतका पोस्टेज खर्च मंजूर करण्याची मागणी यवतमाळ कृषी विभागाने कृषी आयुक्‍तालयाकडे  केली आहे. 

कृषी विभागाकडून जाहिरात क्रमांक ५३४२ ही २४ डिसेंबर २०१३  मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. जाहिरातीद्वारे  शिपाई, पहारेकरी, रोपमळा मदतनीस संवर्गासाठी अर्ज मागविण्यात आले होते. अर्जासोबत ठरावीक रक्‍कमेचा डीडी (धनाकर्ष) देखील  जोडण्याचे जाहिरातीत नमूद होते. त्यानुसार उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी ही पदभरती होती. त्यानुसार त्या-त्या जिल्ह्यात अर्ज करण्यात आले. या माध्यमातून सुमारे ३५ लाख रुपये कृषी विभागाच्या संबंधित खात्यात जमा झाले.  

परंतु त्यानंतर अचानक कृषी विभागाने ही प्रक्रियाच रद्दबातल ठरविली. मात्र कृषी खात्याकडे परिक्षा शुल्क म्हणून जमा असलेले ३५ लाख रुपये परत करण्यात आले नाही. २०१३ पासून या रकमेवर कृषी खात्याला व्याज मिळाल्याचा आरोप परभणी येथील रवीचंद्र काळे यांनी केला आहे. त्यामुळे उमेदवारांची कृषी खात्याकडे पडून असलेली ही रक्‍कम परत मिळावी याकरिता रवीचंद्र काळे यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच कृषी विभागाने जाहिरात देत उमेदवारांना परीक्षा शुल्क नेण्याचे आवाहन केले होते.

यवतमाळ जिल्हा कृषी विभागाकडे २० हजार उमेदवारांचे परीक्षा शुल्क जमा आहे. आवाहनानंतर यातील केवळ १५ उमेदवारांनी कागदपत्र सादर करून त्यांचे पैसे परत नेले. काही उमेदवार मात्र मोबाईलवरून संपर्क साधत परीक्षा शुल्काबाबत केवळ विचारणा करीत असल्याचे आणि न्यायालयात जाण्याचा इशारा देत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. या प्रकरणात आता कृषी आयुक्‍तालय काय भूमिका घेते, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे पाच जिल्ह्यांत उमेदवारांकडून अर्ज आणि शुल्क मागण्यात आले होते. एकाच जिल्ह्याचा शुल्क परतीचा पोस्टेज खर्च तब्बल सात लाख रुपये असल्याने शुल्कापोटी केवळ ३५ लाख रुपये जमा असलेला कृषी विभाग या खर्चाला मंजुरी देईल किंवा नाही, याबाबतही साशंकता व्यक्‍त केली जात आहे. 

शुल्क परतीची तयारी
यवतमाळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने २० हजार उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याची तयारी चालविली आहे. ३५ रुपये प्रती उमेदवार पोस्टेज खर्च याप्रमाणे सुमारे सात लाख रुपयाची गरज त्याकरिता लागणार आहे. त्यामुळे कार्यालयीन खर्चाकरिता ही रक्‍कम मिळावी, अशी मागणी कृषी आयुक्‍तांकडे करण्यात आली आहे.


इतर बातम्या
वनौषधी लागवडीसाठी निधी असूनही अनास्था पुणे: आयुर्वेदात प्रगत असल्याची जगभर शेखी...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करा...सोलापूर : ‘‘उजनीच्या पाण्याचा विषय हा...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...