Agriculture news in marathi Seven lakh metric tonnes of sugarcane balance in Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यात सात लाख मेट्रीक टन ऊस शिल्लक

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, अजूनही सात लाख मेट्रीक टन ऊस गाळपासाठी शिल्लक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून लवकर ऊस तुटण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ‘कोरोना’च्या संसर्गाची भीती ऊसतोडणी मजूरात वाढू लागली असून उन्हाची तीव्रता वाढल्याने ऊस तोडणीच्या कामावर परिणाम होऊ लागला आहे. 

सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, अजूनही सात लाख मेट्रीक टन ऊस गाळपासाठी शिल्लक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून लवकर ऊस तुटण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ‘कोरोना’च्या संसर्गाची भीती ऊसतोडणी मजूरात वाढू लागली असून उन्हाची तीव्रता वाढल्याने ऊस तोडणीच्या कामावर परिणाम होऊ लागला आहे. 

जिल्ह्यात अनेक कारखान्यांचे गाळप हंगाम संपला आहे. सध्या काही प्रमुख कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र कर्फ्यू सुरू असल्याने ऊस तोडणीचा वेग काहीसा मंदावला आहे. तसेच उन्हाची तीव्रता वाढली असल्याने कामाची गतीही संथ झाली आहे. 

कोरोनाची भीती असलीतरी ऊस लवकर तुटून जावा, असे वाटत असल्याचे शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यात अजूनही सात लाख मेट्रीक टन ऊस उभा असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. सध्याच्या परिस्थितीत हा गाळपाचा आकडा मोठा आहे. हा ऊस तोडण्यासाठी अजूनही किमान १५ दिवस लागतील, असा अंदाज आहे. मात्र, त्यासाठी ऊसतोडणी यंत्रणाही कार्यक्षमपणे टिकवणे गरजेचे आहे.

साखर कारखान्यांना नोंद केलेला ऊस तोडणी बंधनकारक असलेतरी विना नोंदही क्षेत्र असण्याची शक्यता आहे. प्रत्येक हंगामाच्या अंतिम टप्पात पुरवणी नोंद करून ऊस गाळपास नेला जातो. मात्र, सध्याची परिस्थिती ‘कोरोना’च्या संसर्गामुळे विस्कळीत झाली आहे. यामुळे विना नोंदीचा ऊस तुटावा यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहे. 

कारखान्यांनी मदत करणे गरजेचे
‘कोरोना’मुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्यामुळे ऊस तोड मजूरही थांबले आहेत. ‘कोरोना’ संसर्ग होऊ नये तसेच विना अडथळा गाळप सुरू रहावे यासाठी कारखान्यांकडूनही प्रयत्न केले जात आहे. बाहेर जाण्यास मज्जाव असलातरी कारखान्यांच्या स्लीप बॅायना प्रत्यक्ष शेतावर जाऊन काम करावे लागत आहे. ‘कोरोना’मुळे तोडणी यंत्रणा विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने साखर कारखान्यांनी एकमेकांना मदत करणे आवश्यक झाले आहे. प्रत्यक्ष मदत झाली तर गाळप हंगाम लवकर संपला जाऊन शेतकऱ्यांना तसेच ऊस तोडणी मजूरांना दिलासा मिळणार आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...