सिंधुदुर्गात दूध संस्थांना सात लाख रुपयांची मदत

सिधुदुर्गात दूध संस्थांना सात लाख रुपयांची मदत
सिधुदुर्गात दूध संस्थांना सात लाख रुपयांची मदत

सिंधुदुर्ग ः पूरस्थिती काळात जिल्ह्यातील दूध संकलन बंद होते. त्यामुळे त्याचा फटका दूध संस्थांना बसला. या संस्थांना शासन स्तरावरून कोणतीही मदत झालेली नाही. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालकांनी एक महिन्याचे मानधन आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार अशी सात लाख रुपयांची रक्कम दूध संस्थांना दिली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सांवत यांनी ही माहिती दिली.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. त्यानतर कोल्हापूर जिल्ह्यात तर महापुराने थैमान घातले. या जिल्ह्यात गोकुळ दूध संघातर्फे होणारे दूध संकलन काही दिवस बंद होते. याचा मोठा फटका येथील दूध संस्थांना बसला. 

 या संस्थांना शासनाच्या वतीने कोणतीही नुकसानभरपाई दिली गेली नाही. त्यामुळे जिल्हा बँकेने या संस्थांना मदत करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा बॅंकेच्या संचालकांनी एक महिन्याचे मानधन आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार बँक व्यवस्थापनाकडे जमा केले. ही रक्कम सात लाख होत असून, ती जिल्ह्यातील ६४ दूध संस्थांच्या सुमारे १४९२ दूध उत्पादक सभासदांना देण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सतीश सांवत यांनी दिली.

या वेळी त्यांच्यासोबत सरव्यवस्थापक अनिरुद्ध देसाई, डॉ. प्रसाद देवधर, संचालक गुरुनाथ पेडणेकर आदी उपस्थित होते. श्री. सांवत यांनी या वेळी शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेने सुरू केलेल्या विमा योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा. १८ ते ७० वयोगटातील कोणताही शेतकरी ६७० रुपये भरून तीन वर्षांसाठी ५० हजार रुपयापर्यंतच्या विम्यास पात्र ठरू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com