नगर-नाशिकच्या सात साखर कारखान्यांच्या निवडणुका लांबल्या

नगर-नाशिकच्या सात साखर कारखान्यांच्या निवडणुका लांबल्या
नगर-नाशिकच्या सात साखर कारखान्यांच्या निवडणुका लांबल्या

नगर : राज्यात शेतकरी कर्जमाफीचे काम करण्यास सहकार विभागाचे अधिकारी व्यस्त राहणार आहेत. परिणामी निवडणुकांची प्रकिया पार पडण्यास अडचणी येणार असल्याने सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुका तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात राज्यातील सहकारी बॅंका, सोसायट्या, सारखर कारखाने यासह २२ हजार ६८० इतक्या संस्थांचा समावेश आहे. नगर, नाशिकमधील सात सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांची प्रक्रियाही थांबली आहे.  राज्यात नैसर्गिक अपत्ती, अवेळी पाऊस यामुळे शेतीचे नुकसान झाले. नुकसान झालेले शेतकरी बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. परिणामी शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. त्यांना नव्याने शेती पीक कर्ज घेण्याला अडचणी निर्माण झल्या आहेत. त्यामुळे शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली. कर्जमुक्ती योजनेचा शेतकऱ्यांना लाभ देताना याद्या करणे, त्याची प्रसिद्धी, कर्जखात्याचे आधार प्रमाणिकरण, जिल्हास्तरीय समितीमार्फत तक्रार निवारण यासह अन्य कामे करावे लागणार आहेत. पुढील हंगामापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे.  सहकार विभागाचे जिल्हास्तरीय क्षेत्र अधिकारी, जिल्हाधिकारी व त्यांचे क्षेत्र अधिकारी यांचा यासाठी सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या ‘अ, ब, क, ड, या प्रवर्गातील संस्थाच्या निवडणुका घेताना मनुष्यबळ कमी पडणार आहे. अडीचशेपर्यंत कमी सदस्य संख्या असलेल्या गृहनिर्माण सहकारी संस्थाच्या निवडणुका यापूर्वीच पुढे ढकलल्या होत्या. आता शुक्रवारीच्या आदेशानुसार जिल्हा बॅंका, सोसायट्या, साखर कारखाने व अन्य मिळून राज्यातील सुमारे २२ हजार ६८० संस्थांच्या निवडणुकाही तीन महिन्यांसाठी पुढे ढकलल्या आहेत.  नगर जिल्ह्यामध्ये सात साखर कारखाने व सोयायट्या व अन्य संस्थ्यांच्या निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यासह अन्य प्रक्रिया सुरू होती, मात्र आता या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. साखर कारखान्याच्या मतदार यांद्याच्या हरकती घेण्याचे काम सुरू होते. ते आता जागेवर थांबवले असल्याचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून सांगण्यात आले. नगर, नाशिकमधील निवडणुका थांबलेले साखर कारखाने   ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखाना (भेंडा)   मुळा सहकारी साखर कारखाना (सोनई)  वृद्धेश्‍वर सहकारी साखर कारखाना (कासार पिंपळगाव)   अशोक सहकारी साखर कारखाना (श्रीरामपूर)  बापूसाहेब नागवडे सहकारी साखर कारखाना (श्रीगोंदा)  कुकडी सहकारी साखर कारखाना (श्रीगोंदा)   कादवा सहकारी साखर करखाना (नाशिक)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com