agriculture news in Marathi, Seven sugar factories in Pune district ended the season | Agrowon

पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आतापर्यंत सात कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असून तोडणी मजूर परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. येत्या पंधरा दिवसांत अजून काही साखर कारखाने बंद होतील.

पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आतापर्यंत सात कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असून तोडणी मजूर परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. येत्या पंधरा दिवसांत अजून काही साखर कारखाने बंद होतील.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आणि वाढता उन्हाचा चटका यामुळे साखर कारखाने गळीत हंगाम लवकर संपवू लागले आहे. त्यातच वाढत असलेली पाणीटंचाईची तीव्रता व जनावरांसाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याची स्थिती बघता मार्चअखेरपर्यंत बहुतांशी साखर कारखाने बंद होतील. या सर्व साखर कारखान्यांनी गेल्या पाच महिन्यांपूर्वी उसाच्या गाळप हंगामाला सुरवात केली होती. यंदा गळीत हंगामात सुमारे १७ साखर कारखाने सुरू झाले होते. 

सध्या पुणे जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाईची झळ वाढू लागली आहे. त्यामुळे उसासह, सर्वच पिकांना पाण्याचा फटका बसू लागला असून कारखान्यांनाही ऊस मिळेनासा झाला आहे. त्यामुळे साखर कारखानदार लवकर कारखाने बंद करू लागले आहेत. जिल्ह्यात एकूण सहकारी अकरा व खासगी सहा साखर कारखाने सुरू झाले होते. या साखर कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता अडीच ते साडे सात हजार टन एवढी आहे. अजून पंधरा ते वीस दिवस साखर कारखाने चालतील अशी शक्यता आहे. 

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी म्हणजेच १२ फेब्रुवारीपासून साखर कारखाने बंद होण्यास सुरवात झाली आहे. यामध्ये भीमा पाटस या साखर कारखान्याने १२ फेब्रुवारी, तर व्यंकटेशकृपा या खासगी साखर कारखान्याने २१ फेब्रुवारीला गळीत हंगाम बंद केला आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने साखर कारखाने गाळप हंगाम संपवू लागले आहे, असे पुणे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयांच्या सूत्रांनी सांगितले.

गाळप हंगाम संपलेले साखर कारखाने 
- भीमा पाटस सहकारी साखर कारखाना
- इंदापूर सहकारी साखर कारखाना 
- घोडगंगा सहकारी साखर कारखाना 
- नीरा भिमा सहकारी साखर कारखाना 
- श्रीनाथ म्हस्कोबा (खासगी) 
- अनुराज शुगर्स (खासगी) 
- व्यंकटेशकृपा शुगर (खासगी)


इतर ताज्या घडामोडी
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...
 शेतकरी केंद्रित अर्थसंकल्पाचा दावा फोलकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १...
वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा...सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य...
कोकणासह नवा महाराष्ट्र घडवूया :...रत्नागिरी  ः आकडा सांगण्यापेक्षा कृतीला...
कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी आता...नाशिक  : केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने...
भाजपचे राज्यात २५ ला धरणे आंदोलन :...मुंबई : भारतीय जनता पक्ष येत्या मंगळवारी (ता. २५...
सांगलीत साडेसहा हजार शेतीपंपांच्या वीज...सांगली  ः  जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या...
‘वनामकृवि’त सोयाबीनच्या पैदासकार ...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...