Agriculture news in Marathi Seven thousand laborers on employment guarantee work in the city district | Page 3 ||| Agrowon

नगर जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामावर सात हजार मजूर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये आता रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरांची संख्या वाढू लागली आहे. सध्या जिल्हाभरात १७६९ कामे सुरू असून या कामांवर ७ हजार ११६ मजूर काम करीत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातून देण्यात आली. मजुरांच्या रोजगारासाठी ३३ हजार कामे मंजूर असल्याचेही सांगण्यात आले. 

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये आता रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरांची संख्या वाढू लागली आहे. सध्या जिल्हाभरात १७६९ कामे सुरू असून या कामांवर ७ हजार ११६ मजूर काम करीत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातून देण्यात आली. मजुरांच्या रोजगारासाठी ३३ हजार कामे मंजूर असल्याचेही सांगण्यात आले. 

नगर जिल्ह्यामध्ये गेल्या चार वर्षांपासून पाऊस नसल्याने सातत्याने टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी तर जिल्हाभरातील लोकांनी गंभीर दुष्काळाला तोंड दिले. अशा काळात मजुरांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे मजुरांच्या रोजगारासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घरकुले, सिंचन विहिरी, गोठा बांधकाम, रस्ता, शौचालय, गाळ काढणे, पाझर तलाव दुरुस्ती, विहीर पुनर्भरण व अन्य कामे केली जातात. 

यंदा पाऊस बऱ्यापैकी पडला असल्याने व शेतात कामे सुरू असल्याने सध्या रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरांची संख्या कमी आहे. सध्या जिल्हाभरात १७६९ कामे सुरू असून या कामांवर ७ हजार ११६ मजूर काम करत आहेत. त्यात सर्वाधिक घरकुलाची कामे सुरू आहेत. विहिरी, फळबाग लागवड, गाळ काढणे, शौचालय, पाझर तलाव दुरुस्ती व अन्यकामांवर मोजकेच मजूर काम करत आहेत. 

मजुरांनी मागणी केल्यानुसार काम उपलब्ध करून दिले जात असून, त्यासाठी ग्रामपंचायतीची २३ हजार २७२ व अन्य यंत्रणांची १० हजार ६१ अशी ३३ हजार ३३३ कामे मंजूर आहेत.

तालुकानिहाय मजूरसंख्या 
अकोले ४४२
जामखेड ७४२
कर्जत ६६३
कोपरगाव २६२ 
नगर ४३१
नेवासा ६६४
पारनेर ५९२
पाथर्डी ४४२
राहाता ४०८
राहुरी १८०
संगमनेर ४२९
शेवगाव ९२८
श्रीगोंदा ६३५
श्रीरामपूर ३१८

 


इतर ताज्या घडामोडी
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
हवामान बदलाला अनुरूप पीक पद्धतीची गरजजागतिक पातळीवर विविध मार्गांनी हवेमधील कार्बन...
कृषी कायद्यांविरोधात शेतकरी विधवांचा...यवतमाळ : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांमुळे...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख ७० हजार...नांदेड : जिल्ह्यात रब्बीमध्ये दोन लाख सत्तर हजार...
पावणेतीन हजार कोटींची कामे मंजूर ः...नांदेड : ‘‘कारोना संसर्गाच्या काळात विकास...
खानदेशातील प्रकल्पांत ५८ टक्के पाणीजळगाव ः खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये...
महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी...नाशिक : ‘‘शेती व शेतीच्या व्यवस्थापनात महिलांचे...
बर्ड फ्लूच्या सूचनांचे पालन करावे ः पंकेअंबाजोगाई, जि. बीड : ‘‘प्रशासनाकडून वेळोवेळी...
वायनरी, पैठणी व्यवसाय अभ्यासक्रम सुरू...नाशिक : ‘‘पुणे विद्यापीठाच्या नाशिक...
बार्शीत तुरीची आवक वाढलीबार्शी, जि. सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार...
शारदानगरमध्ये आयआयटी तंत्रापासून...पुणे : ‘कृषिक २०२१’ निमित्ताने बारामतीच्या...
वातावरणपूरक संत्रा जातींचे संवर्धन करा...अकोला : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः...
कारखान्यांनी सीएनजी गॅसही तयार करावा :...शिराळा, जि. सांगली : राज्याला समृद्धीच्या...
कायदे मागे घेण्यास भाग पाडू : किसान सभानाशिक: केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्यास भाग...
अण्णांनी उपोषण करू नये : फडणवीसराळेगणसिद्धी, जि. नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा...
‘शिवजयंती सोहळा साधेपणाने साजरा करा’पुणे ः ‘‘राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे...
भूजल, पीक व्यवस्थापनाशिवाय पर्याय नाही...नगर : भविष्यकाळात देशासमोर पाणीटंचाईचे सर्वांत...
खानदेशात कडब्याची आवक वाढणारजळगाव ः खानदेशात यंदा रब्बी हंगामाची पेरणी...
‘शिंदे शुगर्स’ चेअरमनविरोधात गुन्हा...सोलापूर : शेतकऱ्याच्या नावे बनावट कागदपत्रे तयार...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात प्रसिद्ध असलेल्या पपई पिकाचा...