नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात हजार क्विंटल बियाणे

नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१ क्विंटल हरभरा व ९४० क्विंटल गहू असे एकूण सहा हजार ९७१ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे.
Seven thousand quintals of seeds in rural seed production in Nanded district
Seven thousand quintals of seeds in rural seed production in Nanded district

नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१ क्विंटल हरभरा व ९४० क्विंटल गहू असे एकूण सहा हजार ९७१ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमानुसार सर्वसाधारण, एससी व एसटी प्रवर्गासाठी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गहू व हरभऱ्याचे प्रमाणित बियाणे अनुदानावर उपलब्ध करून दिले जाते. यासाठी महाबीजमार्फत बीजोत्पादन कार्यक्रमाचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाते. सर्व तांत्रिक बाबींची काळजी घेऊन या पासून उत्पादित होणारे बियाणे शेतकऱ्यांनी योग्य रीतीने जतन करून पुढील दोन हंगामापर्यंत स्वतःसाठी व उर्वरित बियाणे इतर शेतकऱ्यांना पेरणीसाठी द्यावे, असा उद्देश आहे. 

तीन हंगामानंतर शेतकऱ्यांनी बियाणे बदल करणे आवश्यक आहे. योजनेत शेतकऱ्यांना काय लाभ मिळतो. लाभार्थी शेतकऱ्यांनी अनुदान वगळता उर्वरित बियाण्याची रक्कम भरून महाबीजच्या अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे उपलब्ध होईल. यासाठी परमिटचे वाटप कृषी विभागातर्फे करण्यात येईल.

सहा हजार ३१ क्विंटल हरभरा व ९४० क्विंटल गहू असे एकूण सहा हजार ९७१ क्विंटल बियाणे मिळाले आहे. तीन हजार ६२५ सर्वसाधारण, दोन हजार १६० एससी व एक हजार १८५ एसटी प्रवर्गातील नागरिकांसाठी अनुदानावर बियाणे मिळाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com