Agriculture news in marathi Seven thousand quintals of seeds in rural seed production in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात हजार क्विंटल बियाणे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021

नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१ क्विंटल हरभरा व ९४० क्विंटल गहू असे एकूण सहा हजार ९७१ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे.

नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१ क्विंटल हरभरा व ९४० क्विंटल गहू असे एकूण सहा हजार ९७१ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमानुसार सर्वसाधारण, एससी व एसटी प्रवर्गासाठी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गहू व हरभऱ्याचे प्रमाणित बियाणे अनुदानावर उपलब्ध करून दिले जाते. यासाठी महाबीजमार्फत बीजोत्पादन कार्यक्रमाचे
प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाते. सर्व तांत्रिक बाबींची काळजी घेऊन या पासून उत्पादित होणारे बियाणे शेतकऱ्यांनी योग्य रीतीने जतन करून
पुढील दोन हंगामापर्यंत स्वतःसाठी व उर्वरित बियाणे इतर शेतकऱ्यांना पेरणीसाठी द्यावे, असा उद्देश आहे. 

तीन हंगामानंतर शेतकऱ्यांनी बियाणे बदल करणे आवश्यक आहे. योजनेत शेतकऱ्यांना काय लाभ मिळतो. लाभार्थी शेतकऱ्यांनी अनुदान वगळता उर्वरित बियाण्याची रक्कम भरून महाबीजच्या अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे उपलब्ध होईल. यासाठी परमिटचे वाटप कृषी विभागातर्फे करण्यात येईल.

सहा हजार ३१ क्विंटल हरभरा व ९४० क्विंटल गहू असे एकूण सहा हजार ९७१ क्विंटल बियाणे मिळाले आहे. तीन हजार ६२५ सर्वसाधारण, दोन हजार १६० एससी व एक हजार १८५ एसटी प्रवर्गातील नागरिकांसाठी अनुदानावर बियाणे मिळाले आहे.


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...
सत्तावीस हजार सहकारी संस्थांच्या ...पुणे ः राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय...
‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी ...सातारा ः स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क...
शेतकरी उत्पन्न दुपटीच्या बैठकीला २३... नवी दिल्ली ः संसदेच्या कृषी विषयक स्थायी...
दिवाळी सुटीनंतरच्या बेदाणा  सौद्यात...सांगली ः दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न...
स्टॉक लिमिटला नकार;  सोयाबीन बाजाराला...पुणे ः राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार...
भात खरेदीच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरीः ज्या शेतकऱ्यांच्या सात-बारामध्ये...
बीज प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर वाढलावाशीम : शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रियेचे महत्त्व...
सांगलीत कृषिपंपांची वीजजोड तोडणी सुरुसांगली ः कृषिपंपांच्या वीज बिल वसुलीसाठी...
सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे तीन...पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या...
फेरफार नोंदीत पुणे जिल्हा आघाडीवरपुणे ः शेत जमिनी खरेदी विक्री दरम्यान अंत्यत...
सोलापूर जिल्ह्यात खरिपातील पीक ...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप...