लातूर, अकोल्यात तुरीने ओलांडला सात हजारांचा टप्पा

लातूर बाजारात गुरुवारी (ता. ८) तुरीला प्रतिक्विंटलला सात हजार दोनशेचा सर्वाधिक भाव राहिला. तसेच अकोला बाजार समितीत तुरीला कमाल दर सात हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तूर सरासरी ६६०० रुपये दराने विक्री झाली.
Seven thousand stage across Tur
Seven thousand stage across Tur

लातूर/अकोला ः राज्यात काही दिवसांपासून तूर, हरभरा सोयाबीनच्या दरात तेजी आली असल्याचे दिसत आहे. सोयाबीन, हरभऱ्या पाठोपाठ आता तुरीच्या दरातही सुधारणा होत आहे. लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात गुरुवारी (ता. ८) तुरीला प्रतिक्विंटलला सात हजार दोनशेचा सर्वाधिक भाव राहिला. तसेच अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला कमाल दर सात हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तूर सरासरी ६६०० रुपये दराने विक्री झाली.

लातूरमध्ये सोयाबीनला साडे सहा हजारांपेक्षा जास्त भाव मिळाला. मराठवाड्यात लातूरची आडत बाजारपेठ एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. यात तूर, सोयाबीन, हरभऱ्याची तर आवक मोठी असते. दररोज पन्नास शंभर रुपयांनी प्रत्येक शेतीमालाच्या भावात वाढ होताना दिसत आहे. गुरुवारीदेखील तुरीचा कमाल भाव सात हजार दोनशे रुपये राहिला. किमान भाव सहा हजार ४२३ रुपये, तर सर्वसाधारण भाव सहा हजार ९५० रुपये राहिला आहे.

सोयाबीनच्या भावातही मोठी तेजी होताना दिसत आहे. गुरुवारी सोयाबीनला प्रति क्विंटलला सहा हजार ५७० रुपये भाव राहिला. किमान भाव पाच हजार आठशे रुपये व सर्वसाधारण भाव सहा हजार ४५० रुपये राहिला आहे. हरभऱ्याच्या भावात देखील गेल्या काही दिवसांत मोठी वाढ दिसत आहे. गुरुवारी हरभऱ्याला प्रति क्विंटलला कमाल भाव पाच हजार २७१ रुपये राहिला. किमान भाव चार हजार ८३० तर सर्वसाधारण भाव पाच हजार रुपये राहिला आहे.

अकोला बाजारात एप्रिलच्या सुरुवातीला तुरीचा दर सरासरी साडेसहा हजारांच्या आत होता. मात्र आता आठ दिवसांतच दर वाढण्यास सुरुवात झाली. तुरीचा कमाल दर सोमवारी (ता. पाच) ६९५० रुपये झाला होता. दोनच दिवसांनी आणखी दर वाढून सात हजार झाला आहे. सुधारणा झाल्याने बाजारात तुरीच्या आवकेतही वाढ दिसून आली. हजार पोत्यांपेक्षा अधिक आवक होत आहे. यंदाच्या हंगामात तुरीचे उत्पादन अपेक्षितएवढे झालेले नाही. परतीच्या पावसाचा या पिकाला मोठा फटका बसलेला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com