हिंगोली जिल्ह्यात सात हजार टनांवर खतसाठा शिल्लक

हिंगोली : ‘‘आजवर ११ हजार ८६१ टन खतांची विक्री झाली. ७ हजार ५२ टन खतसाठा शिल्लक आहे,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील सूत्रांनी दिली.
 Seven thousand tons of manure stock in Hingoli district
Seven thousand tons of manure stock in Hingoli district

हिंगोली : ‘‘जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात सोमवार (ता.९) पर्यंत विविध पिकांच्या ९ हजार १८१ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यापैकी ७ हजार ६६० क्विंटल बियाण्याची विक्री झाली. दीड हजार क्विंटल बियाणे शिल्लक आहेत. आजवर ११ हजार ८६१ टन खतांची विक्री झाली. ७ हजार ५२ टन खतसाठा शिल्लक आहे,’’  अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील सूत्रांनी दिली.

यंदा जिल्ह्यात १ लाख ५६ हजार ८४४ हेक्टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित आहे. त्यासाठी सार्वजनिक बियाणे उत्पादक कंपन्यांकडे ४ हजार २६५ क्विंटल आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे ४७ हजार ६१ क्विंटल अशी एकूण ५१ हजार ३२६ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली. सोमवार (ता.९ ) पर्यंत सार्वजनिक कंपन्यांनी १ हजार ८२१ क्विंटल आणि खासगी कंपन्यांनी एकूण ९ हजार १८१ क्विंटल बियाण्याचा पुरवठा केला. 

रब्बी ज्वारीचे ४४३ क्विंटल, गव्हाचे १ हजार २० क्विंटल, हरभऱ्याच्या ७ हजार ६५७ क्विंटल, करडईच्या १०.७ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे. त्यापैकी ज्वारीचे ३९४ क्विंटल, गव्हाचे ५०० क्विंटल, हरभऱ्याचे ६ हजार ७५८ क्विंटल, करडईचे ७.८ क्विंटल या पिकांच्या बियाण्याची मिळून एकूण ७ हजार ६६० क्विंटल बियाण्याची विक्री झाली आहे.

यंदाच्या रब्बी हंगामासाठी विविध ग्रेडच्या ६२ हजार ८३३ टन खतांची मागणी करण्यात आली. परंतु, ३३ हजार ३२० टन खतसाठा मंजूर करण्यात आला. एक ऑक्टोबर रोजी ११ हजार ८८४ टन खतसाठा शिल्लक होता. बुधवार (ता.४) पर्यंत ७ हजार २९ टन खतांचा पुरवठा झाला. त्यामुळे एकूण १८ हजार ९१३ टन खतसाठा उपलब्ध झाला होता.

त्यापैकी ११ हजार ८६१ टन खतांची विक्री झाली. ७ हजार ५२ टन खतसाठा शिल्लक आहे. त्यात युरिया १ हजार ६१९ टन, डीएपी १ हजार १०४ टन, पोटॅश ५५० टन, सिंगल सुपर फॉस्फेट ५११ टन, संयुक्त खते ३ हजार २६६ टन खतांचा समावेश आहे,  अशी सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com