पुण्यात २४ हजार शेतकऱ्यांना सात-बारा 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीपासून राज्यातील शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरीत सुधारित सात-बारा मोफत घरपोच वाटप मोहीम सुरू करण्यात आली आहे.
पुण्यात २४ हजार शेतकऱ्यांना सात-बारा  Seven-twelve to 24,000 farmers in Pune
पुण्यात २४ हजार शेतकऱ्यांना सात-बारा  Seven-twelve to 24,000 farmers in Pune

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीपासून राज्यातील शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरीत सुधारित सात-बारा मोफत घरपोच वाटप मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील ५६० गावांत २४ हजार २२० शेतकऱ्यांना मोफत सात-बारा वाटप तर २ हजार ९०५ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली. 

आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार कोविड १९ बाबतच्या नियमांचे पालन करून पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुधारित नमुन्यातील डिजिटल स्वाक्षरीत सात-बारा मोफत वाटपाचा प्रारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुखांच्या उपस्थितीत झाला. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात या मोहिमेला गती देण्यात आली आहे.  पुणे जिल्ह्यात ५६० गावांत २४ हजार २२० शेतकऱ्यांना मोफत सात-बारा वाटप करण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांना ९ ऑक्टोबरपर्यंत सात-बारा वाटप करण्याचे नियोजन आहे. महात्मा गांधी जयंती निमित्त सामाजिक सुरक्षा योजनेचे लाभार्थी व रेशन कार्डमधील नावे समाविष्ट करणे तसेच वगळणे, नवीन रेशन कार्डच्या २ हजार ९०५ लाभार्थ्यांना देखील त्यांच्या अर्जाचा तसेच विनंतीच्या अनुषंगाने लाभ देण्यात आला. 

तालुके  सातबारा वाटप संख्या  हवेली -- -- १००१  पुणे शहर -- -- २५,  पिंपरी चिंचवड ---- ४७५,  शिरूर -- -- १५४६,  आंबेगाव -- -- १६५२  जुन्नर - --१०१५  बारामती -- -- ३५१७  इंदापूर -- -- २४३३  मावळ --  -- ३७१२  मुळशी -- --९५६  भोर -- -- १४८०  वेल्हा -- -- ५८९  दौंड -- -- २१३०  पुरंदर -- -- ९०५  खेड -- -- २७८४   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com