अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘स्मार्ट व्हिलेज’

अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘स्मार्ट व्हिलेज’
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘स्मार्ट व्हिलेज’

अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य सरकारच्या ‘स्मार्टग्राम’ योजनेअंतर्गत निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींमधून बार्शीटाकळी तालुक्यातील गोरव्हा ग्राम पंचायतीची जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतीला ४० लाख व तालुकास्तरावरसुद्धा निवड झाल्यामुळे १० लाख अशाप्रकारे ५० लाख रुपयांचा निधी पुरस्कार स्वरूपात दिला जातो. त्याबरोबर तालुकास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी १०-१० लाख रुपयांचा निधी पुरस्कार स्वरूपात देण्यात येतो. पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल साधून गावांचाही विकास करण्यासाठी सुरू करण्यात आलेली पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना बंद करण्यात आली आहे. या योजनेऐवजी २१ नोव्हेंबर २०१६ पासून ‘स्मार्ट ग्राम’ नवी योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत तालुका व जिल्हा पातळीवरील गावांना पुरस्कार दिले जाणार आहेत. यासाठी मोठ्या ग्रामपंचायती, शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायती, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती व उर्वरित ग्रामपंचायती अशी विभागणी केली जाते. योजनेच्या प्रथमस्तरावर ग्रामपंचायतींनी स्व मूल्यांकन करून प्रस्ताव सादर करायचे असतात. त्यानंतर तालुकास्तरीय समितीकडून या गावांची तपासणी होणार आहे. तालुकास्तरावर सर्वाधिक गुण प्राप्त ग्रामपंचायत द्वितीय स्पर्धेकरिता पात्र ठरते. त्यानंतर सीईओंच्या अध्यक्षतेखालील समिती या ग्रामपंचायतींची तपासणी करते. त्यानंतर तालुकास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लाख, तर जिल्हा स्तरावर निवडल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींना ४० लाखांचे बक्षीस दिले जाते. दरम्यान, जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर सात ग्रामपंचायतींची निवड स्मार्ट ग्राम म्हणून करण्यात आली आहे. या ग्रामपंचायती ठरल्या ‘स्मार्ट’ जिल्हास्तरावर बार्शीटाकळी तालुक्यातील गोरव्हा ग्रामपंचायत स्मार्ट ठरली आहे. त्यानंतर बाळापूर तालुक्यातील मनारखेड, पातुर तालुक्यातील गोंधळवाडी, अकोला येथील बोरगाव खुर्द, मूर्तिजापूर-राजनापूर खिणखिनी, अकोट तालुक्यातील पणज व तेल्हारा तालुक्यातील बाभुळगाव ग्रामपंचायतींची निवड तालुका स्मार्टग्राम म्हणून करण्यात आली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com