agriculture news in marathi, seventeen crore expended on Artificial rain program in Maharashtra | Agrowon

कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात घिरट्या; आतापर्यंत १७ कोटींचा खर्च

तात्या लांडगे
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याच्या निमित्ताने यावर्षी मुंबई, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यातील दोनशे किलोमीटर परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. आतापर्यंत सुमारे १७ कोटींचा खर्च होऊनही प्रयोगाच्या नावाखाली विमानाच्या अवकाशात नुसत्याच घिरट्या सुरू आहेत. प्रयोग अद्याप सुरूच असल्याने त्यासाठी आणखी वाढीव सात ते आठ कोटींचा वाढीव निधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याच्या निमित्ताने यावर्षी मुंबई, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यातील दोनशे किलोमीटर परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. आतापर्यंत सुमारे १७ कोटींचा खर्च होऊनही प्रयोगाच्या नावाखाली विमानाच्या अवकाशात नुसत्याच घिरट्या सुरू आहेत. प्रयोग अद्याप सुरूच असल्याने त्यासाठी आणखी वाढीव सात ते आठ कोटींचा वाढीव निधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मागील वर्षीच्या दुष्काळाच्या झळा अद्याप संपलेल्या नसून सोलापुरातील मोहोळ, करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर, अक्‍कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्‍यांसह मराठवाडा व विदर्भातील ९० हून अधिक तालुक्‍यातील बळीराजाला नैसर्गिक असो की कृत्रिम पावसाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने टॅंकरची संख्या अद्याप कमी झाली नसून भूगर्भातील पाणीपातळीही घटलेलीच आहे. आतापर्यंत राज्यात २०१५ आणि २०१८ मध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले. यंदाही कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार असल्याने त्यातून दुष्काळाच्या झळा कमी होतील, अशी आशा बळिराजाला होती. मात्र, कोट्यवधींचा चुराडा करूनही प्रयोगाच्या नावावर कृत्रिम पाऊस पाडणाऱ्या विमानांच्या अवकाशात नुसत्याच घिरट्या सुरूच असल्याचे चित्र आहे. हा प्रयोग यशस्वी झाला का, त्यातून किती पाऊस पडला, यशस्वी प्रयोगासाठी ठोस संशोधन काय असावे, यावर कोणीच बोलत नाही. 

मुंबई, सोलापूर व औरंगाबाद येथे कृत्रिम पावसासाठी रडार यंत्रणा कार्यान्वित करून त्या परिसरात पाऊस पाडण्यासाठी यंदा ३० कोटींची तरतूद केली. त्यापैकी काही रक्‍कम प्रयोगासाठी खर्च झाली मात्र, पाऊस किती पडला की पडलाच नाही हे सांगता येणार नाही. पावसाळा संपेपर्यंत प्रयोग सुरूच राहणार आहेत. 
- श्रीरंग घोलप, प्रशासकीय अधिकारी, राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प, मुंबई 

कृत्रिम पाऊस दृष्टिक्षेपात

  • रडार यंत्रणा कार्यान्वित    ३ 
  • रडार यंत्रणेवरील खर्च    ४३० कोटी 
  • प्रयोगासाठी आतापर्यंतचा खर्च    १७.७० कोटी 
  • आणखी होणारा अपेक्षित खर्च    २१ कोटी

इतर बातम्या
कर्जमुक्तीत रत्नागिरी जिल्ह्यातील २३४...रत्नागिरी ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
नगर जिल्ह्यात मिळणार डिजिटल स्वाक्षरीचा...नगर  ः ऑनलाइन सात-बारा संगणकीकरणाच्या...
पुणे जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या...पुणे  ः जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले...
नाशिक  : चांदोरी,सोंनाबे येथे...नाशिक  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांचा...नगर  ः  सायेब, मागच्या काळात...
सांगलीच्या ५९६ शेतकऱ्यांचा...सांगली ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
भंडारा जिल्ह्यात ३५ हजार शेतकरी...भंडारा ः राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त...
टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९ पंप सुरूसांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९५०...
नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांची ८८ कोटींवर...नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांतील पंधरा...
कृषी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा...पुणे  ः कृषी विभागाच्या वतीने चौथ्या वार्षिक...
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८...मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...
उस्मानाबादेतील कर्जमुक्तीच्या याद्या...उस्मानाबाद : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
मराठवाड्यातील कोरड्या पडणाऱ्या...औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा उन्हाच्या...
राज्यात उन्हाचा चटका कायम पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत....
‘पीएम-किसान’ योजनेत शेतकऱ्यांना ५१ हजार...नवी दिल्ली: केंद्र सरकारने गेल्या वर्षी पंतप्रधान...
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांचा गदारोळ मुंबई: शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने एकही आश्वासन...
कृषी शिक्षणाचा खर्चही आता लाखाबाहेर पुणे : राज्यातील खासगी कृषी शिक्षण संस्थांच्या...
'तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ व्हावे...गेल्या पाच-दहा वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी...
कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर :...मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर...
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...