शेतकऱ्यांवर साडेसतरा हजार कोटींच्या कर्जाचा बोजा

दीड लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ‘ओटीएस’अंतर्गत उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे. या योजनेची मुदत ३० सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. आतापर्यंत दर तीन महिन्याला अशी मुदतवाढ देण्यात आली आहे. - कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर
कर्जमाफी
कर्जमाफी

सोलापूर : राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जुलै २०१७ मध्ये जाहीर केली होती. दोन वर्षांनंतरही तब्बल ४६ लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असून, शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बँकांचा १७ हजार ५०० कोटी रुपयांचा बोजा कायम आहे.  शेतकऱ्यांना दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. दुष्काळामुळे सध्या उदरनिर्वाहाचा अन् मुलांच्या शिक्षणाचा व विवाहाचा प्रश्न समोर असल्याने शेतकऱ्यांकडे दीड लाखावरील रक्कम भरायलाही पैसे नाहीत. मागील दोन वर्षांत पाच हजार शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.   याची माहिती असतानाही सरकारने त्यांच्यासाठी एकरकमी परतफेड योजना जाहीर केली. आतापर्यंत या योजनेला दर तीन महिन्याला मुदतवाढ दिली जात असून, आता ही सातवी मुदतवाढ आहे. ३० सप्टेंबरची मुदत आता ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे.  पावसाची दडी आणि राज्यातील दुष्काळ, शेतीमालाच्या हमीभावाचा अभाव यासह अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज वाढतच आहे. दुसरीकडे शेतात पीक नसल्याने बँकांनीही कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे आता शेतकरी पुन्हा संपावर जाण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. कर्जमुक्ती करावी, अशी त्यांची मागणी आहे. कर्जमाफीचा पसारा

  • कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी :  ९० लाख
  • अपेक्षित कर्जमाफी :  ३६ हजार कोटी
  • लाभ मिळालेले शेतकरी :  ४४.५६ लाख
  • कर्जमाफी मिळालेली रक्कम :  १८,५०० कोटी
  • ‘ओटीएस’मधील शेतकरी :  ६.५७ लाख
  • कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील शेतकरी :  ४६ लाख
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com