रावेरीमध्ये होणार सातवे शेतकरी साहित्य संमेलन 

२० आणि २१ मार्च असे दोन दिवस संमेलन होणार आहे, अशी माहिती अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी दिली.
sahitya
sahitya

पुणे ः साहित्यिकांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषिजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी सातव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन रावेरी (जि. यवतमाळ) येथे आयोजित केले आहे. २० आणि २१ मार्च असे दोन दिवस संमेलन होणार आहे, अशी माहिती अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी दिली. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथून २ कि.मी अंतरावर असलेल्या रावेरी या छोट्याशा खेड्यात सोबत राम नसलेल्या एकट्या भूमिकन्या सीतामाईचे मंदिर आहे. स्रीत्वाचे आत्मभान आणि आत्मसन्मान जपणारी पावनभूमी म्हणून देशातील एकमेव असलेल्या या सीतामंदीराचे आगळेवेगळे स्थान आहे. संमेलनाच्या आयोजनाकरिता स्वागताध्यक्ष विजय निवल, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे आणि संयोजक बाळासाहेब देशमुख यांनी कार्यभार स्वीकारला असून, विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जयंत बापट, राजू झोटिंग, इंदरचंद बैद, वामनराव तेलंगे, नामदेवराव काकडे, राजेंद्र तेलंगे यांचा प्रामुख्याने समित्यांमध्ये समावेश आहे. कार्यक्रमांची मेजवाणी संमेलनात ‘हिरव्यागार शेतीला हवा कार्बन क्रेडिटचा लाभ’, ‘कोरोनाचे शेतीवरील परिणाम’, ‘बाजारस्वातंत्र्य आणि नवे विधेयक’, ‘दडायचे नाही, आता भिडायचे’ अशा विविध विषयांवरील परिसंवाद राहणार असून, या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार आहेत. संमेलनात शेतकरी गझल मुशायरा, शेतकरी कवी संमेलन, शेतकरी कथाकथन व प्रकट मुलाखत, असे स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले असून, या संमेलनात महाराष्ट्रासोबतच देश-विदेशांतील १००० पेक्षा जास्त मराठी भाषक प्रतिनिधी, नामवंत साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत सहभागी होतील, असा विश्‍वास गंगाधर मुटे यांनी व्यक्त केला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com