agriculture news in Marathi seventh farmer sahitya sammelan in Raveri Maharashtra | Page 2 ||| Agrowon

रावेरीमध्ये होणार सातवे शेतकरी साहित्य संमेलन 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

२० आणि २१ मार्च असे दोन दिवस संमेलन होणार आहे, अशी माहिती अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी दिली.

पुणे ः साहित्यिकांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषिजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी सातव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन रावेरी (जि. यवतमाळ) येथे आयोजित केले आहे. २० आणि २१ मार्च असे दोन दिवस संमेलन होणार आहे, अशी माहिती अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी दिली.

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथून २ कि.मी अंतरावर असलेल्या रावेरी या छोट्याशा खेड्यात सोबत राम नसलेल्या एकट्या भूमिकन्या सीतामाईचे मंदिर आहे. स्रीत्वाचे आत्मभान आणि आत्मसन्मान जपणारी पावनभूमी म्हणून देशातील एकमेव असलेल्या या सीतामंदीराचे आगळेवेगळे स्थान आहे. संमेलनाच्या आयोजनाकरिता स्वागताध्यक्ष विजय निवल, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे आणि संयोजक बाळासाहेब देशमुख यांनी कार्यभार स्वीकारला असून, विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जयंत बापट, राजू झोटिंग, इंदरचंद बैद, वामनराव तेलंगे, नामदेवराव काकडे, राजेंद्र तेलंगे यांचा प्रामुख्याने समित्यांमध्ये समावेश आहे.

कार्यक्रमांची मेजवाणी
संमेलनात ‘हिरव्यागार शेतीला हवा कार्बन क्रेडिटचा लाभ’, ‘कोरोनाचे शेतीवरील परिणाम’, ‘बाजारस्वातंत्र्य आणि नवे विधेयक’, ‘दडायचे नाही, आता भिडायचे’ अशा विविध विषयांवरील परिसंवाद राहणार असून, या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार आहेत. संमेलनात शेतकरी गझल मुशायरा, शेतकरी कवी संमेलन, शेतकरी कथाकथन व प्रकट मुलाखत, असे स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले असून, या संमेलनात महाराष्ट्रासोबतच देश-विदेशांतील १००० पेक्षा जास्त मराठी भाषक प्रतिनिधी, नामवंत साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत सहभागी होतील, असा विश्‍वास गंगाधर मुटे यांनी व्यक्त केला आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...