Agriculture news in marathi For the Seventh Pay Commission Employees of corporations will go on strike | Agrowon

सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील कर्मचारी करणार संप 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जून 2021

विविध महामंडळांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा, यासाठी एकत्र येऊन कृषी समिती स्थापन केली आहे. आता या कृषी समितीने सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी १६ जूनपासून संप करण्याचा इशारा दिला आहे.

नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा, यासाठी एकत्र येऊन कृषी समिती स्थापन केली आहे. आता या कृषी समितीने सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी १६ जूनपासून संप करण्याचा इशारा दिला आहे. त्यात राज्यभरातील चार ते पाच हजार अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. 

महाराष्ट्र शासनाने मार्च २०२० मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्रातील सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली होती. ती घोषणा अजूनही अमलात न आणल्यामुळे राज्यातील विविध महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य सार्वजनिक उपक्रम कृषी समिती केली आहे.

या समितीत महाबीज महामंडळ, वन विकास महामंडळ, वखार महामंडळ, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशन महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शासन स्तरावरून तत्काळ सातवा वेतन आयोगाचा विषय १५ जूनपर्यंत निकाली काढावा, अन्यथा १६ जूनपासून कामबंद आंदोलन करणार असल्‍याचे कृती समितीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात निवेदनात स्पष्ट केले आहे. आंदोलनात सुमारे चार ते पाच हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याचे निवेदनात सांगितले आहे. 

राज्यातील एकाच वेळेत महामंडळातील अधिकारी-कर्मचारी संपावर जात असल्यामुळे मुख्यतः महाबीज व वखार महामंडळामधील अधिकारी व कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी असल्यामुळे खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

वखार महामंडळाच्या गोदाममधील धान्य गरजूंना वाटप करण्यास विलंब होईल. शेतकऱ्यांच्या धान्य खरेदीवरही परिणाम होईल. रासायनिक खतांचा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी २४ मार्च २०२१ रोजी मंत्रिमंडळ समोर सादर केलेली आहे, त्याला अद्याप मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली नाही. त्या अनुषंगाने शासनाने तातडीने विचार करणे गरजेचे आहे, असे कृषी समितीचे अध्यक्ष निळोबा ढोरे व संघटक सचिव रमेश बल्लया यांनी सांगितले. 


इतर बातम्या
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...