‘माफसू’तील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग 

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) आणि घटक महाविद्यालयातील शिक्षण व शिक्षक समकक्ष पदांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
MAFSU
MAFSU

नागपूर : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) आणि घटक महाविद्यालयातील शिक्षण व शिक्षक समकक्ष पदांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयाचा राज्यातील ३८८ प्राध्यापकांना फायदा होणार आहे. 

वेतनाचे स्तर, सुरुवातीचे वेतन आणि कुलगुरू यांचे वेतन निश्चित करण्यात येईल. या पदांना सुधारित वेतन संरचना आणि महागाई भत्ता व इतर भत्ते १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येणार आहेत. या निर्णयाचा लाभ ३८८ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदांवर कार्यरत व्यक्तींना होणार आहे. याकरिता १७.९४ कोटी रुपये एवढा निधी थकीत रकमेसाठी तसेच १२ कोटी एवढा निधी वार्षिक खर्चासाठी देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

‘माफसू’ दृष्टीक्षेपात  महाविद्यालये : १०  मंजूर पदे : ८००  भरलेली पदे : ३८८  प्रतिक्रिया शासनस्तरावर सातव्या वेतन आयोगासाठी पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांना यश आले आहे. ‘माफसू’अंतर्गत राज्यात दहा महाविद्यालये आहेत. यातील सुमारे ३८८ प्राध्यापकांना त्याचा लाभ होईल. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०१९ मध्येच सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.  - डॉ. आशिष पातूरकर, कुलगुरू, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com