Agriculture news in marathi Seventy crores lost fruit growers in Nagar district | Agrowon

नगर जिल्ह्यात फळ उत्पादकांना सत्तर कोटींचा फटका 

सूर्यकांत नेटके
शनिवार, 18 एप्रिल 2020

नगर ः ‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात आठवडीबाजार व बाजार समित्या बंद आहेत. पुणे, मुंबईला वाहतूक करणारी वाहनेही बंद आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे मातीमोल दराने विक्री करावी लागत आहेत. तर ग्राहकांना मात्र दुपटीच्या दराने खरेदी करावी लागत आहेत. एकट्या नगर जिल्ह्यामध्ये विक्रीअभावी आणि दर मिळत नसल्याने नेहमीच्या तुलनेत साधारण ७० ते ८० कोटींपेक्षा अधिक रकमेचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

नगर ः ‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात आठवडीबाजार व बाजार समित्या बंद आहेत. पुणे, मुंबईला वाहतूक करणारी वाहनेही बंद आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे मातीमोल दराने विक्री करावी लागत आहेत. तर ग्राहकांना मात्र दुपटीच्या दराने खरेदी करावी लागत आहेत. एकट्या नगर जिल्ह्यामध्ये विक्रीअभावी आणि दर मिळत नसल्याने नेहमीच्या तुलनेत साधारण ७० ते ८० कोटींपेक्षा अधिक रकमेचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

नगर जिल्ह्यात कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ११ हजार हेक्टर क्षेत्रावर फळपिकांचे क्षेत्र आहे. मात्र, खरबूज, कलिंगडासह अन्य फळपिकांच्या क्षेत्राबाबत कृषी विभागाच्या आकडेवारीत ताळमेळ नाही. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कलिंगड, खरबुजाचे यंदाचे क्षेत्र आहे. यातील बहुतांश शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून उत्पादन घेणारे आहेत. बाजारातील मागणीनुसार साधारण फेब्रुवारी, मार्च महिन्यात फळे विक्रीला येतील, अशा अंदाजानेच लागवड केली जाते. यंदा मात्र नेमक्या विक्रीच्या काळातच आठवडीबाजार, बाजार समित्यामधील फळबाजार बंद झाले आहे. 

नगर जिल्ह्यात एकमेव नगर बाजार समितीत फळांची खरेदी-विक्री सुरू असली तरी खरेदी करणाऱ्यापेक्षा विक्री करणारे अधिक असल्याने बाजारात विक्री आणूनही मातीमोल दराने विक्री करत आहेत. ग्राहकांना मात्र खरेदीच्या तिप्पट दराने विक्री होत आहे. विक्री आणि दराअभावी आत्तापर्यंत नगर जिल्ह्यात फळ उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे सत्तर ते ८० कोटींपेक्षा अधिक रकमेचा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका कलिंगड, खरबूज, द्राक्ष, पेरुला बसला आहे. मात्र, नेमका किती फटका बसला याबाबत कृषी विभागाकडे आकडेवारीच नाही. 

फळ उत्पादकांना फटका बसण्याची कारणे

  • फळे विक्रीच्या काळातच बाजार बंद राहिले. थेट विक्रीचा प्रयत्न केला तरी तीस टक्केही दर नसल्याने खर्च निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शहरात फळे विक्री करणे सोडून दिले. 
  • ग्रामीण भागातून वाहनधारकही शहरात येण्यासाठी धजावत नाहीत. ज्या शेतकऱ्य़ांकडे वाहने नाहीत. त्यांची मोठी अडचण निर्माण झाली. 
  • कृषी विभागाने वाहतूक परवाने देत असल्याचे सांगितले असले तरी अनेकांना परवाने मिळाले नाही. पोलिस रस्त्यावर अडवतात. पेट्रोल पंपावर इंधन मिळण्यासाठी कसरत करावी लागते, याचाही परिणाम फळ विक्रीवर झाला. 

मी यावर्षी खरबुजाचे उत्पादन घेतले. ‘कोरोना’मुळे यंदा बाजार बंद असल्याने विविध ठिकाणी धडपड करत विक्री केली. यंदा बाजारात नेता न आल्याने दरवर्षीच्या तुलनेत केवळ चाळीस टक्के दर मिळाल्याने मोठा आर्थिक फटका बसला.
- राजेंद्र आवारे, शेतकरी लाखेफळ ता. शेवगाव, जि. नगर 
 


इतर अॅग्रो विशेष
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण पुणेः केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...