agriculture news in marathi Seventy Five lakhs Rupees of Farmers due in Phundkar horticulture Scheme | Page 3 ||| Agrowon

फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख थकले

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेला मागील दोन वर्षांपासून घरघर लागली आहे. नवीन फळबाग लागवडीसाठी लक्षांक तर नाहीच परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या फळबागेचे ७५ लाख ६५ हजार रुपये थकले आहेत. 

नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत अशा मोठ्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी फडणवीस सरकारने सुरु केलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेला मागील दोन वर्षांपासून घरघर लागली आहे. नवीन फळबाग लागवडीसाठी लक्षांक तर नाहीच परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या फळबागेचे ७५ लाख ६५ हजार रुपये थकले आहेत. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी तत्कालीन राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २० जून २०१८ रोजी सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून पीक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणे हा होता. फळबाग लागवडीमुळे नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करून काही प्रमाणात हवामान बदल आणि ऋतू बदलाची दाहकता व तीव्रता सौम्य करण्यास मदत होणार असे सांगण्यात आले. 

नांदेड जिल्ह्यात २०१९-२० मध्ये या योजनेतून १३४ हेक्टर व २०२०-२१ मध्ये ४८ हेक्टर अशा १८२ हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आली. परंतु या योजनेतंर्गत लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान मात्र रखडले आहे. यात अनुसूचित जाती प्रवर्ग सहा हेक्टर, अनुसूचित जमाती १४.६० हेक्टर, महिला २२ तर इतर १३९.९६ हेक्टर अशा ३५७ शेतकऱ्यांचे ७५ लाख ६५ हजार रुपये थकले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली. 

दरम्यान, मागील दोन वर्षापासून या योजनेतंर्गत फळबाग लागवडीचे लक्षांक आले नाही. यामुळे जलयुक्त शिवार प्रमाणेच ही फळबाग योजनाही आघाडी सरकार गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

२०१८ला सुरू झाली योजना... 
शासन निर्णयानुसार राज्यात २०१८-१९ च्या खरीप हंगामापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही नवीन राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली. योजनेत आंबा, डाळिंब, काजू, पेरू, सीताफळ आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, नारळ, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर आदी फळबाग लागवड करण्यात येत होती. 
 


इतर ताज्या घडामोडी
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती...अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त...
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवारचंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार;...नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि...
सांगलीत १० ते १५ टक्क्यांनी सोयाबीनचे...सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी...लखनौ ः लखीमपूरमधील हिंसाचारानंतर राज्य...
लखीमपूर खेरीतील हिंसाचार...नवी दिल्ली ः शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर...
पुणे जिल्ह्यातील पशुधन बाजार बंदपुणे ः केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
मागणी वाढल्याने उन्हाळ  कांदा...नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत...
आजच्या ग्रामसभांना ग्रामसेवकांचा विरोध नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २)...
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय...नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते....
वीजदर सवलतीबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक कोल्हापूर : राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे...नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
बँकांनी कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर करावीत...वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि...
शेतकरी आंदोलकांवर सर्वोच्च न्यायालय...नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण...
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘...माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...